Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:02 IST2025-09-23T12:02:05+5:302025-09-23T12:02:59+5:30
सोमवारी दुपारी सुटी असल्याने मूळ गावी आले होते

Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन
हातकणंगले : राधानगरी येथे कृषी अधिकारी असलेले अजित ओमाण्णा कोठावळे (वय ५०, सध्या रा. शिरोळ रोड, आश्रय हॉटेलच्या पाठीमागे, जयसिंगपूर) यांनी आळते, ता. हातकणंगले येथे भावाच्या घरी पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. दिलीप कोठावळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित ओमाण्णा कोठावळे हे मूळ आळते गावचे असून, सध्या ते जयसिंगपूर येथे राहत होते. ते राधानगरी येथ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते नेहमी आजारी असल्याने आजारपणाला कंटाळून त्यांनी सोमवारी सायंकाळी आळते येथील मूळ गावी भाऊ दिलीप कोठावळे यांच्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
ते सोमवारी दुपारी सुटी असल्याने मूळ गावी आले होते. विश्रांती घेतो असे सांगून त्यांनी पहिल्या मजल्यावरती बेडरूममध्ये आत्महत्या केली. याची फिर्याद दिलीप वामन कोठावळे (वय ५५) यांनी हातकणंगले पोलिसांत दिली असून, अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.