आहेराची रक्कम दिली अपंग संस्थेला

By Admin | Updated: December 17, 2014 23:11 IST2014-12-17T20:33:53+5:302014-12-17T23:11:04+5:30

उपाध्ये, देशमाने परिवारांनी जपली बांधीलकी

The amount of money given to the disabled society | आहेराची रक्कम दिली अपंग संस्थेला

आहेराची रक्कम दिली अपंग संस्थेला

पेठवडगाव : आहेरामध्ये आलेली व लग्नखर्चात बचत करून जमा झालेली अशी अकरा हजार रुपयांची रक्कम वधू-वरांच्या परिवारांनी अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली. ही सामाजिक बांधीलकी उपाध्ये (वडगाव) व देशमाने (निपाणी) परिवारांनी जपली.
येथील सुरेश उपाध्ये यांचा मुलगा संदीप व निपाणी येथील संतोष देशमाने यांच्या मुलीचा विवाह झाला. यामध्ये दोन्ही परिवारांनी सामाजिक बांधीलकी जपण्याचा निर्णय घेतला. आहेराची रक्कम व लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मदत करण्याचे ठरविले. अपंग दिनादिवशी ११ हजार रुपये प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्याकडे माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नगराध्यक्षा विद्या पोळ, डॉ. ओ. व्ही. कवठेकर, व्ही. जी. बेळे, शाहीर शहाजी माळी, राजन शेटे, दिलीपसिंह यादव, प्रशांत साळुंखे, सरोजिनी उपाध्ये, अनुपमा उपाध्ये, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The amount of money given to the disabled society