Kolhapur: भाच्याला फोन करून घेतली नदीत उडी, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:44 IST2025-06-23T15:43:41+5:302025-06-23T15:44:01+5:30

मोबाइल रस्त्याकडील बाजूला टाकून जोरात आरोळी ठोकून पुराच्या पाण्यात उडी घेतली

Amit Tanaji Rokade, a young man from Bhudargad, Devkewadi taluka, called his nephew and jumped from the bridge of the Vedganga river at Madilge Budruk kolhapur | Kolhapur: भाच्याला फोन करून घेतली नदीत उडी, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून शोध सुरू

Kolhapur: भाच्याला फोन करून घेतली नदीत उडी, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून शोध सुरू

गारगोटी : देवकेवाडी (ता. भुदरगड) येथील अमित तानाजी रोकडे (वय २७) या तरुणाने भाच्याला फोन करून मडिलगे बुद्रुक येथील वेदगंगा नदीच्या पुलावरून उडी मारल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. भुदरगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण अंधार असल्याने काही करता आले नाही. काल, रविवारी पुन्हा गारगोटीचे पोलिस आणि आपत्कालीन सेवा पथक अमितचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तो सापडला नाही.

शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील मडिलगे बुद्रुक येथील वेदगंगा नदीच्या पुलाच्या कठड्यावर पलीकडे अमित उभा होता. त्यावेळी तेथून निघालेल्या दोघांना तो लोखंडी संरक्षक कठड्याच्या पलीकडे उभा असलेला दिसला. त्यांनी त्याला हटकले असता अमितने मोबाइल रस्त्याकडील बाजूला टाकून जोरात आरोळी ठोकून पुराच्या पाण्यात उडी घेतली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

उडी मारण्यापूर्वी अमितने मी मडिलगे येथील नदीत उडी मारणार असल्याचा फोन भाचा सुरज वाईंगडे याला केला होता. दरम्यान, अमितच्या फोनवर सुरज वाईंगडेचा फोन आला. त्यावेळी त्याने अमितने नदीत उडी मारल्याचे सांगितले. ही घटना समजताच पोलिस निरीक्षक किरण लोंढे, पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलिस उपनिरीक्षक शेख, पोलिस पाटील युवराज धोंगडे, अनिल गुरव घटनास्थळी आले. पूर आणि अंधार असल्याने काहीही करता येत नव्हते. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून गारगोटीचे पोलिस आणि आपत्कालीन सेवा पथक अमितचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. संध्याकाळपर्यंत तो सापडला नाही.

Web Title: Amit Tanaji Rokade, a young man from Bhudargad, Devkewadi taluka, called his nephew and jumped from the bridge of the Vedganga river at Madilge Budruk kolhapur