किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा चरणस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:01+5:302021-02-05T06:57:01+5:30

कोल्हापूर : काहीअंशी धुक्याची झालर असल्यामुळे किरणांची तीव्रता कमी झाली. त्यामुळे किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा ...

Ambabai's foot touch on the second day of Kirnotsava | किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा चरणस्पर्श

किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा चरणस्पर्श

कोल्हापूर : काहीअंशी धुक्याची झालर असल्यामुळे किरणांची तीव्रता कमी झाली. त्यामुळे किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा चरणस्पर्श करीत किरणे देवीच्या डाव्या बाजूने लुप्त झाली.

उत्तरायण किरणोत्सव सोहळ्यातील दुसऱ्या दिवशी किरणे महाद्वार कमानीतून सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी मंदिरात दाखल झाली. त्यानंतर गरूड मंडप, गणपती मंदिर, कासव चौक, पितळी उंबरा, पहिली पायरी, तिसरी पायरी, कटांजल असा प्रवास करीत ६ वाजून १४ मिनिटांनी चरणस्पर्श केला. त्यानंतर ६ वाजून १७ मिनिटांनी किरणे किंचित वर जात डावीकडे लुप्त झाली. यानंतर देवीची आरती करण्यात आली. यंदाच्या उत्तरायणमधील पहिला दिवशी (दि.२९) किरणे गरूड मंडपापर्यंत पोहोचून लुप्त झाली होती. त्यामुळे शनिवारी दुसऱ्या दिवशी किरणांची तीव्रता प्रथम चांगली होती. त्यानंतर हवेत धुक्याची झालर असल्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली. त्याचा परिणाम म्हणून देवीचा चरणस्पर्शापर्यंतच किरणांचा प्रवास झाला. आज, रविवारी किरणांची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी वातावरण स्वच्छ असल्यामुळे देवीला सूर्यस्नान झाले होते. किरणोत्सावदरम्यान दर्शन रांगा बंद करण्यात आल्या होत्या. चरणस्पर्श झाल्यानंतर आरती झाली. त्यानंतर पुन्हा दर्शन रांगा पूर्ववत सुरू झाल्या.

किरणांचा प्रवास असा,

वेळ

महाद्वार कमान ५ वाजून १८ मिनिट

गरूड मंडप चबुतरा ५ वाजून ३८ मिनिटे

गणपती मंदिर ५ वाजून ४६ मिनिटे

कासव चौक ६ वाजून २ मिनिटे

पितळी उंबरा ६ वाजून ७ मिनिटे

पहिली पायरी ६ वाजून ११ मिनिटे

तिसरी पायरी ६ वाजून १२ मिनिटे

मूर्तीचा चरणस्पर्श ६ वाजून १४ मिनिटे

कोट

पाच दिवसांच्या किरणोत्सवात दुसऱ्या दिवशी धुक्यामुळे किरणे केवळ अंबाबाई देवीच्या चरणापर्यंतच पोहोचून डावीकडे लुप्त झाली. आज, रविवारी पूर्णक्षमतेने किरणोत्सव होण्याची अपेक्षा आहे.

- महेश जाधव, अध्यक्ष , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

फोटो : ३००१२०२१-कोल-अंबाबाई

ओळी : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या उत्तरायण किरणोत्सव सोहळ्यातील दुसऱ्या दिवशी शनिवारी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Ambabai's foot touch on the second day of Kirnotsava