Kolhapur: अंबाबाईचे दर्शन उद्यापासून पूर्ववत, मूर्ती संवर्धन प्रक्रियेमुळे एक दिवस वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:37 IST2026-03-17T12:37:19+5:302026-03-17T12:37:32+5:30

तोपर्यंत मंगल श्रीकलश व उत्सवमूर्तीचे दर्शन

Ambabai's darshan to be restored from tomorrow, extended by one day due to idol conservation process | Kolhapur: अंबाबाईचे दर्शन उद्यापासून पूर्ववत, मूर्ती संवर्धन प्रक्रियेमुळे एक दिवस वाढवला

Kolhapur: अंबाबाईचे दर्शन उद्यापासून पूर्ववत, मूर्ती संवर्धन प्रक्रियेमुळे एक दिवस वाढवला

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची पाहणी व संवर्धन प्रक्रियेसाठी आणखी एक दिवस लागणार असल्याने देवीचे दर्शन उद्या बुधवारपासून पूर्ववत सुरू होईल. नियोजनानुसार आज मंगळवारपासून दर्शन सुरळीत होणार होते. मात्र आता आणखी एक दिवस वाढवण्यात आला आहे.

श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांतर्गत शनिवारपासून गाभारा जतन संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये अंबाबाईसह श्री महाकाली, महासरस्वतीच्या गाभाऱ्यातील दगडी भिंती, फरशीच्या कामासोबतच अंबाबाईच्या मूळ मूर्तीचेदेखील संवर्धन केले जाणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार अंबाबाई मूर्ती पाहणी व संवर्धन प्रक्रियेसाठी आज मंगळवारचा आणखी एक दिवस लागणार आहे. 

त्यामुळे उद्या बुधवारी दुपारी साडेबाराच्या आरतीपासून अंबाबाईचे दर्शन पूर्ववत सुरू होईल. तोपर्यंत भाविकांनी मंगल श्रीकलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.

Web Title : कोल्हापुर अंबाबाई दर्शन: मूर्ति संरक्षण के कारण दर्शन बुधवार से फिर शुरू

Web Summary : कोल्हापुर में अंबाबाई का दर्शन मूर्ति संरक्षण कार्य बढ़ने के कारण बुधवार दोपहर से फिर शुरू होगा। मंदिर के गर्भगृह का जीर्णोद्धार चल रहा है। तब तक भक्त मंगल श्रीकलश और उत्सवमूर्ति के दर्शन कर सकते हैं।

Web Title : Kolhapur Ambabai Darshan Resumes Wednesday After Idol Preservation Extended

Web Summary : Ambabai's darshan in Kolhapur will resume Wednesday afternoon due to extended idol preservation work. The restoration of the temple's sanctum sanctorum is underway. Devotees can visit Mangal Shrikalash and Utsavmurti until then.