कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात दोन महिन्यात 'इतक्या' कोटींची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:12 IST2026-02-18T18:10:53+5:302026-02-18T18:12:12+5:30

डिसेंबर व जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांमुळे या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती

Ambabai treasury in Kolhapur has received crores in two months | कोल्हापुरातील अंबाबाईच्या खजिन्यात दोन महिन्यात 'इतक्या' कोटींची भर

संग्रहित छाया

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात दोन महिन्यात २ कोटी २१ लाख ३५ हजार ५२६ इतक्या घसघशीत देणगीची भर पडली आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांमुळे या काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती, परिणामी मंदिराच्या उत्पन्नातही मोठी भर पडली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अंबाबाई मंदिर आवारातील ११ दानपेट्यातील रकमेची मोजदाद मागील आठवड्यात सुरू झाली होती ती सोमवारी पूर्ण झाली. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये या देणगी पेट्या उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पेट्या भरल्याने पुन्हा उघडण्यात आल्या. डिसेंबर हा सलग सुट्ट्यांचा महिना असल्याने याकाळात शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसांमध्ये रोज १ ते २ लाख भाविकांची नोंद होत होती. वाढलेल्या भाविक संख्येमुळे देणगी पेट्यांमधील रक्कमदेखील वाढली आहे.

सर्वाधिक रक्कम पेटी क्रमांक २ मध्ये

मंदिर आवारात देवस्थान समितीच्या ११ देणगी पेट्या असून सर्वाधिक ६४ लाख ३९ हजार ४७६ इतकी रक्कम गाभाऱ्यासमोरील पेटी क्रमांक २ मध्ये आहे. पेटी क्रमांक एक मध्ये ५९ लाख १३ हजार ८१४ तर पेटी क्रमांक ७ मध्ये ४७ लाख १५ हजार ९७४ इतकी रक्कम जमा झाली आहे.

Web Title : कोल्हापुर के अंबाबाई मंदिर के खजाने में दो महीने में करोड़ों की वृद्धि

Web Summary : दिसंबर और जनवरी की छुट्टियों के दौरान श्रद्धालुओं की भारी भीड़ के कारण कोल्हापुर के अंबाबाई मंदिर के खजाने में दो महीनों में ₹2.21 करोड़ का उल्लेखनीय इजाफा हुआ। गर्भगृह के सामने स्थित दान पेटी नंबर 2 में सबसे अधिक राशि जमा हुई।

Web Title : Ambabai Temple's Treasury Swells with Crores in Two Months

Web Summary : Kolhapur's Ambabai temple treasury saw a significant increase of ₹2.21 crore in donations over two months due to high visitor numbers during December and January holidays. The highest amount was collected in donation box number 2, located in front of the sanctum.