Navratri 2024: कोल्हापूरच्या अंबाबाईचा उद्या नगरप्रदक्षिणा सोहळा, २१ फुटांचे मुख्य कमळ मुख्य आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 14:14 IST2024-10-10T14:13:12+5:302024-10-10T14:14:57+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त उद्या, शुक्रवारी (दि.११) श्री अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणा सोहळ्याचे न्यू गुजरी मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य ...

Navratri 2024: कोल्हापूरच्या अंबाबाईचा उद्या नगरप्रदक्षिणा सोहळा, २१ फुटांचे मुख्य कमळ मुख्य आकर्षण
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त उद्या, शुक्रवारी (दि.११) श्री अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणा सोहळ्याचे न्यू गुजरी मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी २१ फुटांचे मुख्य कमळ हे मुख्य आकर्षण असेल अशी माहिती अध्यक्ष किरण नकाते यांनी दिली.
पालखी मार्गावर विविध रंगांच्या छटा असणारी भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. त्यासाठी पुणे, मुंबईचे कलाकार येणार आहेत. तसेच डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी केली जाईल. नेत्रदीपक लाईट आणि साउंड सिस्टमचाही सहभाग असेल. यावेळी भाविकांसाठी अडीच हजार किलो रव्यापासून तुपातील शिऱ्याचा प्रसाद केला जाणार आहे. मिरवणूक मार्गात एलईडी लाईटचा प्रकाशझोत असेल.