Kolhapur: ‘दक्षिण’चा पुढचा आमदार अमल महाडिकच - खासदार धनंजय महाडिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:02 IST2023-09-04T14:01:06+5:302023-09-04T14:02:17+5:30

कळंबा : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र ...

Amal Mahadikch Next MLA of Kolhapur South Legislative Assembly says MP Dhananjay Mahadik | Kolhapur: ‘दक्षिण’चा पुढचा आमदार अमल महाडिकच - खासदार धनंजय महाडिक 

Kolhapur: ‘दक्षिण’चा पुढचा आमदार अमल महाडिकच - खासदार धनंजय महाडिक 

कळंबा : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा देशात आणि राज्यात भाजप निर्विवाद सत्तेत येणार आहे. जिल्ह्यात भगवे वादळ उठले असून अमल महाडिकच ‘दक्षिण’चा पुढचा आमदार असणार हे निश्चित असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. राजलक्ष्मीनगर येथे भाजपच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अमल महाडिक होते.

माजी आमदार अमल महाडिक यांनी येत्या पालिका निवडणुकीत भाजपची निर्विवाद सत्ता आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी नगरसेवक विजय खाडे, सूत्रसंचालन विनायक कुलकर्णी, आभार प्रदर्शन सुधीर राणे यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम संग्राम पाटील, तृप्ती पाटील, सुधीर राणे, मिथुन मगदूम यांसह भाजप पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

दक्षिणच्या आमदारकीचा गुंता निकाली

आमदार अमल महाडिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत दक्षिणसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली. त्यामुळे प्रश्न उरलेच नाहीत. आताचे आमदार किती विकासकामे करतात माहीत नाही. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून अमल महाडिक उमेदवार असणार आणि निश्चितच निवडून येणार, असे सांगत खासदार धनंजय महाडिक यांनी दक्षिणची लढत स्पष्ट केली.

Web Title: Amal Mahadikch Next MLA of Kolhapur South Legislative Assembly says MP Dhananjay Mahadik