शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कठीण असली तरी मी जिगरबाज माणूस

By admin | Updated: July 10, 2015 00:13 IST

महादेवराव महाडिक : शरद पवार यांच्याशी साखर उद्योगातील अडचणींवर चर्चा

कोल्हापूर : निवडणुकीसाठी माझी फिल्डिंग नेहमीच असते. सातत्याने लोकांशी संपर्क आहे तरीही मला निवडणूक अवघड असत; परंतु जिगरबाज माणूस नेहमीच जिंकत असतो. त्यामुळे आतापासून काळजी करण्याचे कारण नाही. ‘योग्य वेळ आल्यावर बघू आणि बोलू,’ असे आमदार महादेवराव महाडिक यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची बुधवारी महाडिक यांनी बंद खोलीत भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याबद्दल जिल्ह्यातील जनतेला उत्सुकता होती म्हणून गुरुवारी ‘लोकमत’ने त्यांना त्याबद्दल विचारणा केली. त्यावर आमदार महाडिक म्हणाले, ‘विधानपरिषद निवडणुकीस अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आताच या विषयावर चर्चा करण्याची घाई नाही. पवारसाहेब देशातील मोठे नेते आहेत. त्यांनी दोनवेळा साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत केली होती. त्यामुळे त्यांना भेटून साखर उद्योगासंबंधीच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यामध्ये राजकीय चर्चा झालेली नाही.’ येथील पंचशील हॉटेलच्या खोली क्रमांक ४०२ मध्ये वास्तव्यास असलेल्या पवार यांना आमदार महाडिक बुधवारी सकाळी भेटले. या दोघांच्या चर्चेवेळी केवळ माजी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील खोलीच्या बाहेर थांबले होते. कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या पवार यांना आमदार महाडिक नेहमी भेटतात; परंतु यावेळी मात्र त्यांच्या भेटीला विधानपरिषदेचे संदर्भ जोडले गेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. महाडिक यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे साकडे घातले, अशा स्वरूपाची ही चर्चा आहे. ‘या महादेवराव,’ अशा शब्दांत पवार यांनी महाडिकांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्यात साखर कारखान्यांवर चर्चा झाली. तुमचे कारखाने कसे चालले आहेत, अशी विचारणा पवारांनी केली. त्यावेळी सध्याच्या अडचणी त्यांना सांगितल्या. वीस मिनिटे ही चर्चा झाली आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. हॉटेलमधून बाहेर पडताना ते एकदमच बाहेर पडले. दोघांत चर्चा काय झाली, याचे गुपित केवळ मुश्रीफ यांनाच ठाऊक आहे. (प्रतिनिधी)पवार-महाडिक भेटीला विधान परिषदेची किनारमहाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बाजार समितीच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ला ठरवून ‘बाय’ दिला आहे. या पक्षाची ‘गोकुळ’मध्ये व विधान परिषदेसाठी आपल्याला मदत व्हावी, हे त्यामागील राजकारण आहे. ‘गोकुळ’मध्ये ती मदत झाली म्हणूनच त्यांची पुन्हा सत्ता आली. तिथे सतेज पाटील, विनय कोरे व हसन मुश्रीफ अशी युती झाली असती, तर सत्तांतर अटळ होते. आताही विधान परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील हेच त्यांना आव्हान देतील, अशा हालचाली आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहिली, तर त्यांना ही लढत सोपी जाऊ शकते. त्यासाठी पवार यांचा ‘शब्द’ महत्त्वाचा असल्यानेच महाडिक त्यांच्या भेटीला गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.पवारसाहेब देशातील मोठे नेते. त्यांनी दोनवेळा साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर साखर उद्योगासंबंधीच्या अडचणी मांडल्या. त्यामध्ये राजकीय चर्चा झालेली नसल्याचे महाडिक यांनी स्पस्ट केले.