कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक दहा मधून अक्षय विक्रम जरग हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यांनी उध्दवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांचा चूलतभाऊ राहूल इंगवले यांचा पराभव केला.जरग यांचे वडिल विक्रम जरग हे काँग्रेसचे पदाधिकारी. काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी जी समिती नेमली होती त्यामध्येही विक्रम जरग होते परंतू त्यांना काँग्रेसची उमेदवारी आपल्या मुलग्यास मिळवून देता आली नाही. तिथे राहूल इंगवले यांच्यासाठी उध्दवसेना आग्रही राहिली. त्यामुळे काँग्रेसने अक्षय जरग यांच्या आईने निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतू अक्षय जरग माघार घ्यायला तयार झाले नाहीत. माझ्यामागे कार्यकर्त्यांची फळी आहे आणि त्याबळावर मी जिंकू शकतो असा विश्वास त्यांना होता आणि तो खरा ठरला. या प्रभागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेश सावंत होते. त्यांचाही पराभव झाला. अपक्ष लढून ताकद पोहोचणार नाही म्हणून जरग यांनी तातडीने आमदार विनय कोरे यांची भेट घेवून त्यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी स्विकारली आणि नारळाची बाग चिन्ह घेवून गुलाल मिळवला. सत्तेच्या सारीपाटात जनसुराज्य महायुतीसोबत असल्याने महायुतीची एक जागा आपसूकच वाढली. उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या जिव्हारी लागणारा हा पराभव आहे.
Web Summary : Akshay Karg, from Jansurajya Shakti, won Kolhapur's Ward 10, defeating Rahul Ingwale. Denied a Congress ticket, Karg joined Jansurajya, backed by MLA Vinay Kore. This victory strengthens the Mahayuti alliance and is a setback for Uddhav Sena's district chief.
Web Summary : जनसुराज्य शक्ति के अक्षय जरग ने कोल्हापुर के वार्ड 10 में राहुल इंगवले को हराया। कांग्रेस का टिकट न मिलने पर जरग विधायक विनय कोरे के समर्थन से जनसुराज्य में शामिल हुए। यह जीत महायुति गठबंधन को मजबूत करती है और उद्धव सेना के जिला प्रमुख के लिए एक झटका है।