शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजरा घनसाळ, काळा जिरगा'चे सुधारित नवे वाण तयार, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:03 IST

अकृषी विद्यापीठांतर्गत अशा प्रकारचे संशोधन कार्य राज्यात प्रथमच झालेले आहे,

कोल्हापूर : आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या प्रचंड मागणी असलेल्या सुप्रसिद्ध तांदळाच्या सुगंधी वाणांच्या सुधारित जाती शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी तयार केल्या आहेत. हे वाण शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी सिद्ध आहेत. अकृषी विद्यापीठांतर्गत अशा प्रकारचे संशोधन कार्य राज्यात प्रथमच झालेले आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एन.बी. गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली.कोल्हापूर जिल्हा भाताच्या अनेक खास देशी वाणांनी समृद्ध आहे. त्यांना ग्राहकांची मोठी पसंती आहे. यामध्ये व्यापाऱ्यांकडून तसेच ग्राहकांकडून प्रचंड मागणी असलेल्या आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या दोन सुप्रसिध्द उत्तम सुगंधित तांदळाच्या जातींचा समावेश आहे. या सुगंधी देशी वाणांमध्ये खनिजे आणि इतर पोषकतत्त्वे मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळेही त्यांना बाजारात मोठी मागणी आहे.या देशी वाणांमध्ये अधिक उंची, अल्प उत्पन्न आणि परिपक्व होण्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी अशा काही समस्या आहेत. यामुळेच त्यांची लागवड मर्यादित भागांमध्ये केली जाते. ही बाब लक्षात घेऊन प्रा. गायकवाड आणि अधिविभागातील संशोधक विद्यार्थी शीतलकुमार देसाई व अकेश जाधव यांनी या दोन देशी वाणांच्या अनुवांशिक गुणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा तसेच त्यांचे उत्पादन वाढवण्याचा संशोधन प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पांसाठी डीएई-बीआरएनएस, मुंबई आणि डीएसटी-एसईआरबी, नवी दिल्ली यांनी या देशी भातांच्या वाणांचे सुधारीकरण कार्यक्रमाअंतर्गत अनुक्रमे ३२ लाख व ४० लाख रुपयांचा निधी दिला होता.विविध प्रकारच्या म्युटेजेनिक एजन्टचा वापर करून या पिकांच्या सहा पिढ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामधून अधिक उत्पादन देणारे, लवकर परिपक्व होणारे कमी उंचीचे आणि आडवे न पडणारे असे गुणधर्म असणारे वाण विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. अकृषी विद्यापीठांतर्गत अशा प्रकारचे संशोधन होण्याची ही पहिलीच घटना आहे, असेही त्यांनी सांगितले.४८ देशी वाणांचे संकलनकोल्हापूर जिल्ह्यातून ९ सुवासिक आणि ३९ असुवासिक अशा एकूण ४८ भातांच्या देशी वाणांच्या प्रजाती संकलित केल्या आहेत. २०२० आणि २०२१ या सलग दोन वर्षांच्या खरीप हंगामात त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील शेतकरी, महिला आणि पुरूषांच्या बचत गटांना या संकलित केलेल्या देशी वाणांचे संवर्धन करण्यासाठी वितरण केले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

या संशोधनासाठी विभागातील डॉ. व्ही.ए. बापट, कोल्हापूरचे कृषी अधीक्षक, आजरा तालुका कृषी अधिकारी आणि आजरा घनसाळ संघ, आजरा यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ