शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात तरुणांसह महिलांनी केली रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

आजरा : आजरा शहरात आज पोलीस प्रशासनाचा प्रतिबंध झुगारत रंगपंचमीचा उत्सव तरुणाईने साजरा केला. आपापल्या गल्लीमध्ये लहान मुलांसह तरुणाई ...

आजरा : आजरा शहरात आज पोलीस प्रशासनाचा प्रतिबंध झुगारत रंगपंचमीचा उत्सव तरुणाईने साजरा केला. आपापल्या गल्लीमध्ये लहान मुलांसह तरुणाई व महिलांनी रंगपंचमीमध्ये विविध रंगांची उधळण केली. गेल्या अनेक वर्षांपासून आजऱ्याची रंगपंचमी गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रंगपंचमी रस्त्यावर येऊन साजरी करू नये, अन्यथा कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले होते. मात्र सर्वच ठिकाणी या आदेशाला केराची टोपली दाखवत तरुणाईने रंगांचा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे साजरा केला. अनेक गल्ल्यांमध्ये महिलांनी एकमेकींना रंग लावत, आपणही रंगपंचमीत सहभागी असल्याचे दाखवून दिले. लहान मुलांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच रंगाची पिचकारी मारण्यास सुरुवात केली होती. तरुणाईने आपल्या मित्रपरिवाराला रंगपंचमीत विविध रंगांची अक्षरश: अंघोळ घातली. आजरा शहरातील प्रमुख मार्ग वगळता सर्वत्र रंगांची उधळण करण्यात आली.

वीकेंड लॉकडाऊननंतर आज आजऱ्यात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सोशल डिस्टंसिंगचा यावेळी फज्जा उडाला. अनेक नागरिकांनी तोंडाला मास्कही घातले नव्हते. नगरपंचायत प्रशासन व पोलिसांनीही यावेळी बघ्याची भूमिका घेतली. मात्र तालुक्यात सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, अशा प्रकारची बेफिकिरी भविष्यात अडचणीची ठरणार आहे.

फोटोगॅलरी -

१) आजऱ्यात रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करताना महिला.