शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

बड्या नेत्याच्या पाठिंब्याचे विमान कोसळले

By admin | Updated: August 1, 2015 00:34 IST

इस्लामपूर बाजार समिती विश्लेषण : जयंतरावांपुढे सर्वपक्षीय विरोधकांचा धुव्वा

अशोक पाटील -इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटले होते. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरणार असे चित्र होते. मात्र पाटील यांच्या राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत ‘नाद करायचा नाय’ असे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब कोरे यांना शहरातील बड्या नेत्याने छुपा पाठिंबा दिला होता, परंतु त्या नेत्याची ताकद दिसलीच नाही. त्यामुळे पाठिंब्याचे हे विमान सपशेल कोसळले.मर्यादित सभासद असलेल्या इस्लामपूर बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र विरोधकांनी तयार केले होते. परंतु मतदार संघातील सहकारी संस्था, सोसायट्या, ग्रामपंचायती, प्रक्रिया संस्था आदींवर जयंत पाटील यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविण्यात काहीही अडचण आली नाही.काळमवाडी येथे निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करताना जयंत पाटील यांनी, या निवडणुकीत विजय निश्चित आहे, परंतु तो उच्चांकी असायला हवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकतर्फी विजय मिळवून दिला.व्यापारी गटात दोन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीतील बाळासाहेब कोरे यांनी बंडखोरी करून ‘विमान’ या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यांना पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. त्यामुळे विजयभाऊ पाटील यांचे अंतर्गत विरोधक माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे यांचे समर्थक राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार माणिक गायकवाड यांचा पराभव होणार, अशी चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांनी एका रात्रीत सर्व घडामोडी करीत गायकवाड व शामसुंदर पाटील यांनाच निवडून आणण्याचा आदेश दिला. त्यामुळे गायकवाड (८७0 मते) व पाटील (७५९ मते) विजयी झाले. विरोधी काँग्रेसचे विजय पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची ६८0 मते मिळाल्याने त्यांचे विमान सपशेल कोसळले.(प्रतिनिधी)इस्लामपूर मतदारसंघात प्रथमच जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय युवकांची फळी निर्माण झाली आहे. मतदारसंघातील सर्व संस्थांवर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. मतदारही ठराविक असल्याने राष्ट्रवादीचा विजय निश्चित होता. परंतु आगामी काळात जनतेतून होणाऱ्या निवडणुकीला आम्ही आव्हान देऊ.- सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा बँक.- राहुल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्यराष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब कोरे यांना माझा पाठिंबा नव्हता. निवडणुकीच्या प्रचारात माझा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीचे सर्वच नेते, कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सामील होते. त्यामुळेच बाजार समितीवर आमचे नेते जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे.- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोदपक्षप्रतोद विजय पाटील यांचे असे उद्योग १९९१ पासून सुरू आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभे करण्याच्या खेळ्या ते नेहमीच खेळतात. परंतु सभासद, व्यापारी आदी जयंत पाटील यांनाच मानणारे आहेत, हे विजय पाटील यांनी समजून घ्यावे.- अ‍ॅड. सुधीर पिसे, माजी नगराध्यक्ष