हवाई सेवेमुळे कोल्हापूरला चालना : डॉ. विजय दर्डा; नवी मुंबईसाठी दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:11 IST2026-03-30T18:10:45+5:302026-03-30T18:11:49+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विस्तारित हवाई सेवेमुळे येथील औद्योगिक, व्यावसायिक, पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास ‘लोकमत एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन, ...

हवाई सेवेमुळे कोल्हापूरला चालना : डॉ. विजय दर्डा; नवी मुंबईसाठी दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरु
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विस्तारित हवाई सेवेमुळे येथील औद्योगिक, व्यावसायिक, पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास ‘लोकमत एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
कोल्हापूरच्या हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये रविवारी आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला. कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या हवाई मार्गाबरोबर दिवसातून दोन वेळा इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा रविवारपासून सुरू झाली. या विमानसेवेचा शुभारंभानंतरच्या पहिल्या विमानातून पहिले प्रवासी म्हणून कोल्हापूर विमानतळावर डॉ. विजय दर्डा यांचे गुलाबपुष्प देऊन खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत केले.
यावेळी विजय दर्डा आणि खासदार महाडिक यांच्यात विविध विषंयावर चर्चा झाली. खासदार महाडिक यांनी उडाण योजनेतून कोल्हापूरचे हवाई क्षेत्र विस्तारत चालल्याचे सांगितले. यावेळी कोल्हापूर विमानतळावरील अधिकारी अनिल श्रीवास्तव, राजेश अहिरवार, बेनू नायक, अंकित व्यास, रविराज लामकाने, राजेश पेडणेकर यांच्यासह इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते.