शरद पवार यांनी दिली शाहू महाराज ‘जय’ची घोषणा; कोल्हापुरातील दसरा चौक, लक्ष्मी विलास पॅलेस येथे केलं शाहूंना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:17 IST2025-06-27T13:16:26+5:302025-06-27T13:17:01+5:30

'संपूर्ण आयुष्य सामान्यांसाठी जगणारा असा हा राजा होता, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो'

After the workers chanted Chatrapati Shahu Maharaj ki Jay Sharad Pawar raised his hands and shouted the slogan Jay | शरद पवार यांनी दिली शाहू महाराज ‘जय’ची घोषणा; कोल्हापुरातील दसरा चौक, लक्ष्मी विलास पॅलेस येथे केलं शाहूंना अभिवादन

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आल्यानंतर त्यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. दसरा चौकातही त्यांनी अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराज की जय, अशी घोषणा दिल्यानंतर पवार यांनी हात उंचावून ‘जय’चा नारा दिला.

पवार यांनी सुरुवातीला कसबा बावडा येथील शिवपुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. लक्ष्मीविलास पॅलस येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, शाहू महाराज हे देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या अंतःकरणामध्ये रुजलेले, सामावलेले आहेत. राज्य कसे करावे याचा आदर्श त्यांनी देशपातळीवर निर्माण केला. राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी त्यांच्या जन्मस्थळी येण्याचे मला भाग्य लाभले. संपूर्ण आयुष्य सामान्यांसाठी जगणारा असा हा राजा होता, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. यावेळी बाबा महाडिक यांनी पवार यांना शाहू प्रतिमा भेट दिली.

Web Title: After the workers chanted Chatrapati Shahu Maharaj ki Jay Sharad Pawar raised his hands and shouted the slogan Jay