शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: अठरा वर्षानंतर महाडिक घराण्याचे कोल्हापूर महापालिकेवर वर्चस्व

By भारत चव्हाण | Updated: February 4, 2026 13:24 IST

२००७ मध्ये सत्तांतर झाले आणि आमदार सतेज पाटील - मंत्री हसन मुश्रीफ यांचे पर्व सुरू झाले होते

भारत चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महाडिक घराण्याने १८ वर्षानंतर दमदार एंट्री केली असून या घराण्याच्या शब्दाला महत्त्व आल्याचे महापालिका निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना तसेच महापौरपदाचे उमेदवार निश्चित करताना दिसून आले. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राज्यव्यापी कारभार पाहता पुढील पाच वर्षे महानगरपालिका भाजपचे अर्थातच खासदार धनंजय महाडिक यांचे वर्चस्व राहणार आहे.भारतीय जनता पक्षाने २०१५ च्या निवडणुकीत १४ नगरसेवक निवडून आणले होते, यावेळच्या निवडणुकीत ही संख्या २४ पर्यंत वाढविण्यात भाजपने आपली सर्व ताकद लावली होती. काहीही करून महापौर भाजपचेच करायचे असा निर्धार करून त्यांनी सगळी यंत्रणा त्या दिशेने कामाला लावली होती. त्यात ते यशस्वीही झाले. महायुतीत त्यांच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे भाजपचेच पहिले महापौर होणार हे स्पष्टच झाले होते. पण महापौर कोण होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता. तोही आता संपला आहे.२०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने निवडून येणार नाहीत अशा कार्यकर्त्यांसाठी आग्रह धरला होता. धनंजय महाडिक यांनी हा आग्रह चुकीचा असल्याचे भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. पण मंत्री पाटील यांनी त्यांचा आग्रह सोडला नाही. ज्या जागांवर उमेदवार निवडून येणार नाहीत असे सांगितले गेले होते तेथे भाजप उमेदवारांचे पराभव झाले आणि सत्तेपर्यंत पोहोचण्यास काही जागा कमी पडल्या. भाजप-ताराराणी आघाडीने तेव्हा ३३ जागा जिंकल्या होत्या.भाजप नेत्यांनी २०१५ मध्ये जी चूक केली तशीच चूक २०२५ च्या निवडणुकीत पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली. ज्या ज्या जागा वाटून घेतल्या तेथील सर्वाधिक उमेदवार हे महाडिक गटाचे आहेत. मूळ भाजपचे फार कमी आहेत. त्यामुळेच महापौरपदाचे उमेदवार ठरविताना मंत्री पाटील यांना महाडिक हेही भाजपचे मूळ कार्यकर्तेच झाल्याचे सांगावे लागले. मूळ भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा पराभव झाला, तर काही जणांनी निवडणुकीला उभे राहण्याचेही धाडस केले नाही.महाडिकांकडून बेरजेचे राजकारण मंत्री पाटील यांनी धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांना पक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. महाडिक यांनीही बेरजेचे राजकारण करत जे निवडून येणार नाहीत, त्यांना थांबायला सांगितले. त्याचा परिणाम भाजपचे संख्याबळ वाढण्यावर, महापौर होण्यावर झाला. १९९० पासून महाडिक घराणे महापालिका राजकारणात आहे. त्यानंतर २००७ मध्ये सत्तांतर झाले आणि आमदार सतेज पाटील - मंत्री हसन मुश्रीफ यांचे पर्व सुरू झाले. अठरा वर्षाच्या विजनवासानंतर महाडिक यांनी पुन्हा महापालिका राजकारणात थेट प्रवेश केला असून आता त्यांच्या शब्दाची किमतही वाढली आहे. कारण महापौरपदी निवड होणाऱ्या रूपाराणी निकम या त्यांच्याच कार्यकर्त्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahadik family regains control of Kolhapur Municipal Corporation after 18 years.

Web Summary : After 18 years, the Mahadik family has made a strong comeback in Kolhapur Municipal Corporation politics. Their influence is evident in candidate selection, securing the mayor's position. Their increased power is evident with their candidate elected as mayor.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Corporationनगर पालिकाMahayutiमहायुतीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकAmal Mahadikअमल महाडिकBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील