शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोगनोळी तपासणी नाक्यात कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 10:41 AM

tollplaza Kognoli naka kolhapur- महाराष्ट्र व केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर तपासणी पथक उभे केले आहे. कोगनोळी जवळील या सीमेवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करूनच राज्यात प्रवेश दिला जात आहे. शेजारील राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातही दुसऱ्या टप्प्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सावध पवित्रा घेत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासन करडी नजर ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देकर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजरप्रांताधिकारी युकेश कुमार यांची कोगनोळी तपासणी नाक्यास भेट

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : महाराष्ट्र व केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर तपासणी पथक उभे केले आहे. कोगनोळी जवळील या सीमेवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करूनच राज्यात प्रवेश दिला जात आहे. शेजारील राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातही दुसऱ्या टप्प्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सावध पवित्रा घेत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासन करडी नजर ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे.कोगनोळी टोल नाका याठिकाणी कोरोना तपासणी पथकाची उभारणी केल्यानंतर कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर आज प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी या तपासणी नाक्यास भेट देऊन पाहणी केली व कोरोना निगेटिव प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याच्या वक्तव्यास दुजोरा दिला.यावेळी प्रांताधिकारी युकेश कुमार म्हणाले, प्रमाणपत्र सक्तीचे केले असले तरी त्याबाबत जनतेमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. या सीमेवर वाहतूक जास्त आहे, त्याबरोबरच स्थानिक लोकांचाही वारंवार प्रवास होत असतो. या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी हळूहळू पावले उचलली जात आहेत.यावेळी निपाणी तालुका पंचायत कार्यवाहक मल्लिकार्जुन उळागड्डी, निपाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरन्नावर, तालुका आरोग्य अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.प्रांताधिकाऱ्यांचे प्रवाशांना आवाहनटोल नाक्यावरून जाणारी वाहने थांबवून प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी कर्नाटक राज्याने कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. कोरोना चाचणी करून तसे प्रमाणपत्र घेतले आहे का? अशी विचारणा केली. यावेळी अनेक वाहनधारक याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावcorona virusकोरोना वायरस बातम्या