शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून वर्कशॉप घोटाळा बेदखल?

By admin | Updated: May 24, 2016 01:01 IST

महानगरपालिकेचा कारभार : अद्याप चौकशीचे आदेश नाहीत, अधीक्षक रजेवर

कोल्हापूर : महानगरपालिकेतील घोटाळे काही नवीन नाहीत, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यांची चर्चा तत्काळ सुरू होते. अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यांची मात्र तेवढी चर्चा होत नाही. प्रशासनही त्याची फारशी गांभीर्याने दखल घेत नाही. एका अधिकाऱ्यांने गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या घोटाळ्याची इत्यंंभूत माहिती महासभेत जाहीर केल्यानंतरही त्याची दखल गेल्या चार दिवसांत घेण्यात आलेली नाही. त्यांची चौकशीही सुरू झालेली नाही. ‘आयुक्त नाहीत’ एवढे एकच उत्तर देऊन सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे. दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आक्षेप नोंदविले गेले आहेत ते वर्कशॉप अधीक्षक एम. डी. सावंत आठ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. आयुक्त पी. शिवशंकर सोमवारी बाहेर गावी होते. त्यामुळे त्यांच्याकडून चौकशीचे कसलेही लेखी आदेश झाले नाहीत, तेव्हा चौकशी करायची तर कोणी करायची हा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर होता. अधीक्षक सावंत यांच्यावर महासभेत अनेक नगरसेवकांनी गंभीर आरोप केले असताना, त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी चौकशीचे आदेश देणे गरजेचे होते. मात्र, आयुक्त शिवशंकर यांनी नोटीस देत आहे, त्यांचा खुलासा आल्यावर कारवाई करु, असे मोघम उत्तर दिले होते. त्यावरूनच हे प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते. आयुक्त नसल्यामुळे सोमवारी चौकशीचे आदेश निघाले नाहीत. कदाचित आज, मंगळवारी आयुक्त आल्यानंतर आदेश देतील, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मनपा अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचा थेट आरोप होण्याची गेल्या अनेक वर्षांतील हा पहिलाच प्रकार आहे. यापूर्वी वीज शाखेतील चंद्रकांत केंबळे याच्यावर असा आरोप झाला होता. त्यात हा अधिकारी दोषी आढळला. त्यालासुद्धा तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला होता. तसाच प्रयत्न आताही सावंत यांच्याबाबतीत घडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)चौकशी समिती नेमण्याची आवश्यकतावर्कशॉप अधीक्षक एम. डी. सावंत यांच्यावर झालेले घोटाळ्याचे गंभीर आरोप, शिवाय त्यांच्यासंबंधीच्या निनावी पत्रातील मजकूर याबाबतची चौकशी करण्याचे काम एखाद्या अधिकाऱ्यांवर सोपवून चालणार नाही. तर त्यासाठी तीन सदस्यांची चौकशी समितीच नेमावी लागेल. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. सावंत यांच्यामागे आणखी काही अधिकारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चौकशी समितीत नगरसेवकांचा एक प्रतिनिधी असायला हवा. या चौकशी बरोबरच महानगरपालिकेतील अंतर्गत लेखा परीक्षकांनीही स्वतंत्रपणे तातडीने लेक्षापरीक्षण केले पाहिजे, तरच त्यातून सत्य बाहेर येईल. आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वत: जातीने लक्ष घालून ही चौकशी केली पाहिजे, अशी नगरसेवकांची मागणी आहे.