शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कृती समितीसमोर प्रशासनाची उडाली भंबेरी

By admin | Updated: December 7, 2014 00:58 IST

‘सीपीआर’ बैठक : प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन

 कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)च्या प्रश्नी सर्वपक्षीय बचाव कृती समिती आक्रमक झाल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने हे प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळा (डीपीडीसी)मधून निधी देऊ, असे आश्वासन आज, शनिवारी करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले. ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीबरोबर आरोग्य विभागाशी निगडित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजाराम माने यांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत पाटील आले होते. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीने महाविद्यालय प्रशासनाला ७ मे २०१४ रोजी सर्पदंश व श्वानदंश लस, औषधे, वैद्यकीय उपकरणे, आदी १९ मुद्द्यांचे निवेदन दिले होते. याचा पाठपुरावा प्रशासनाने किती केला? तसेच जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन होते. या बैठकीत आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे, जिल्हा परिषदेचे डॉ. पी. बी. पाटील, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्याधिकारी योगेश साळे, समितीचे निमंत्रक वसंत मुळीक यांच्यासह भगवान काटे, शिरीष देशपांडे, संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब देवकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)