भारतीय ब्लू महिला क्रिकेट संघात आदिती गायकवाडची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:09 PM2018-11-10T18:09:28+5:302018-11-10T18:10:57+5:30

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू आदिती गायकवाड हिची गुंटूर येथे होणाऱ्या महिला चॅलेंजर टी-२० चषक स्पर्धेसाठी खुल्या भारतीय ब्लू महिला संघात निवड झाली.

Aditya Gaikwad of the Indian Blue Women's Cricket team | भारतीय ब्लू महिला क्रिकेट संघात आदिती गायकवाडची वर्णी

भारतीय ब्लू महिला क्रिकेट संघात आदिती गायकवाडची वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय ब्लू महिला क्रिकेट संघात आदिती गायकवाडची वर्णीगुंटूर येथे होणाऱ महिला चॅलेंजर टी-२० चषक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू आदिती गायकवाड हिची गुंटूर येथे होणाऱ्या महिला चॅलेंजर टी-२० चषक स्पर्धेसाठी खुल्या भारतीय ब्लू महिला संघात निवड झाली.

गुंटूर येथे १० ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय ब्लू, भारतीय ग्रीन, भारतीय रेड या संघांमध्ये साखळी सामने होणार आहेत. या स्पर्धेतून भारतीय महिला संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आदितीची प्रथमच या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड होत आहे.

यापूर्वी तिने महाराष्ट्र १९ वर्षांखालील महिला संघात चार वर्षे स्थान मिळविले होते. तिची यापूर्वी २०१५-१६ ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या पश्चिम विभागीय १९ वर्षांखालील महिला संघातही निवड झाली होती.
 

 

Web Title: Aditya Gaikwad of the Indian Blue Women's Cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.