शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९७५ शिक्षक अतिरिक्त

By admin | Updated: November 21, 2014 00:54 IST

समायोजन अंतिम टप्प्यात : सर्र्वाधिक हातकणंगलेत; नव्याने भरती बंद

भीमगोंडा देसाई-  कोल्हापूर --शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार यंदाच्या पटसंख्येनुसार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९७५ शिक्षक (सर) अतिरिक्त झाले आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातच सर्वांचे समायोजन करण्यावर शिक्षण विभागाने ‘विशेष लक्ष’ केंद्रित केले आहे. सोयीच्या ठिकाणीच समायोजन व्हावे, यासाठी काही ‘सर’ लोकप्रतिनिधींकडून ‘फिल्डिंग’ लावीत आहेत. जिल्ह्यात खासगी अनुदानित माध्यमिक शाळा ७०८ आहेत. या शाळांमध्ये शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शिक्षकाला मान्यता दिली आहे. शहरी भागात ३०, तर ग्रामीण भागात २५ मुलांमागे एक शिक्षक असे प्रमाण आहे. दरम्यान, दिवसेंदिवस मुलांची संख्या झपाट्याने खालावत आहे. यामुळे सर्वच शाळांमधील पटसंख्या खाली येत आहे. परिणामी शिक्षकांची संख्या कमी होत आहे. अतिरिक्त होऊ नये म्हणून जून महिना सुरू झाल्यानंतर विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षक आणि संस्थाचालकांची धावपळ सुरू होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार शिक्षक संच निश्चित केला आहे. विद्यार्थिसंख्या व कार्यरत असलेले शिक्षक, मंजूर पदे या सर्वांची माहिती घेण्यात आली आहे. नियमानुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांमध्ये डी. एड.धारकांची संख्या अधिक आहे. अतिरिक्त झालेला डी. एड.धारक पदवीधर असल्यास संबंधित संस्थेतच रिक्त जागा असल्यास समायोजन केले जात आहे. समायोजनाची प्रक्रिया गतीने सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षणसंस्था चालक, मुख्याध्यापक यांची वर्दळ शिक्षण विभागामध्ये वाढली आहे. माध्यमिक शिक्षण विभाग गजबजून गेला आहे. आपल्या संस्थेतील अतिरिक्त शिक्षक बाहेर जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंबंधी माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.