शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यानेच मारला डल्ला गणपतींच्या आभूषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

कोल्हापूर : गणेशोत्सव कालावधीत रात्रीच्या वेळी मंडपात झोपणाऱ्या कार्यकर्त्यानेच श्री गणेश मूर्तीवरील चांदीच्या आभूषणावर डल्ला मारल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ...

कोल्हापूर : गणेशोत्सव कालावधीत रात्रीच्या वेळी मंडपात झोपणाऱ्या कार्यकर्त्यानेच श्री गणेश मूर्तीवरील चांदीच्या आभूषणावर डल्ला मारल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सुयश उर्फ वरुण महेश हुक्केरी (वय १९, रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट) याला अटक केली. त्याच्या ताब्यातील चोरीचे सुमारे ६५ हजारांचे चांदीचे दागिने जप्त केले. टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेशोत्सव कालावधीत टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या मंडपात रात्री कार्यकर्ते झोपत होते. तरीही दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री श्री गणेश मूर्तीवरील चांदीची काही आभूषणे अज्ञाताने चोरल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस समांतर तपास करत होते. स्थानिक गु्न्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना संबंधीत मंडळाच्या गणेश मूर्तीवरील दागिने सुयश हुक्केरी याने चोरल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून श्री गणेश मूर्तीच्या हातातील चांदीची दोन कडी, चार अंगठ्या असा सुमारे १,३८१ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक किशोर डोंगरे, हे. कॉ. विजय कारंडे, किरण गावडे, कुमार पोतदार, प्रदीप पोवार, अजय गोडबोले आणि पांडुरंग पाटील यांनी केली.

पाण्याच्या खणीजवळ लपवले दागिने

चोरट्याने मूर्तीवरील चोरलेले चांदीचे दागिने प्रथम आपल्याजवळ ठेवले, पोलीस चौकशी करत असताना त्याने ते योगेश पाटील यांच्या घरानजीकच्या खणीजवळ लपवून ठेवले होते, ते त्याने काढून पोलिसांच्या स्वाधीन केले.

फोटो नं. २१०९२०१-कोल-चोरी०१

ओळ : कोल्हापुुरात राजाराम चौकातील गणेश मंडळातील मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने संशयित आरोपी सुयश हुक्केरी याला अटक केली.

फोटो नं. २१०९२०१-कोल-चोरी०२

ओळ : जप्त केलेले चोरीतील चांदीचे दागिने.

210921\21kol_3_21092021_5.jpg~210921\21kol_4_21092021_5.jpg

ओळ : कोल्हापूरात राजाराम चौकातील गणेश मंडळातील मूर्तीवरील चांदीचे दागिणे चोरल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने संशयीत आरोपी सुयश हुक्केरी याला अटक केली. फोटो नं. २१०९२०१-कोल-चोरी०२ओळ : जप्त केलेले चोरीतील चांदीचे दागिणे.~ओळ : कोल्हापूरात राजाराम चौकातील गणेश मंडळातील मूर्तीवरील चांदीचे दागिणे चोरल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने संशयीत आरोपी सुयश हुक्केरी याला अटक केली. फोटो नं. २१०९२०१-कोल-चोरी०२ओळ : जप्त केलेले चोरीतील चांदीचे दागिणे.