बेकायदेशीर मद्यसाठा करणाऱ्यांवर कारवाई, पाचजणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:41 IST2020-07-18T12:40:11+5:302020-07-18T12:41:44+5:30

विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या मद्याचा साठा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून सुमारे सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

Action against those who stockpile illegal liquor | बेकायदेशीर मद्यसाठा करणाऱ्यांवर कारवाई, पाचजणांवर गुन्हे

बेकायदेशीर मद्यसाठा करणाऱ्यांवर कारवाई, पाचजणांवर गुन्हे

ठळक मुद्देबेकायदेशीर मद्यसाठा करणाऱ्यांवर कारवाईपाचजणांवर गुन्हे

कोल्हापूर : विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या मद्याचा साठा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून सुमारे सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाने शुक्रवारी सदर बाजार, कनाननगर, आदी परिसरांत छापे टाकले. यात बेकायदेशीररीत्या मद्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून देशी-विदेशी असा सुमारे सात हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कडकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे व त्यांच्या पथकाने केली

Web Title: Action against those who stockpile illegal liquor