शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

विनानंबर, नियमबाह्य ५२५ वाहनांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 2:24 PM

विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर रविवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

ठळक मुद्देशहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम दिवसात पावणेदोन लाखाहून अधिक दंड वसूल

कोल्हापूर : विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर रविवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

अवघ्या एका दिवसात तब्बल ५२५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे पावणेदोन लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली.कोल्हापूर शहरात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होते तसेच पर्यटकांचीही गर्दी वाढते. याचा फायदा घेत चेनस्नॅचिंग, पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने या गुन्ह्यात विनानंबर अथवा नंबरप्लेट अर्धवट असलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. त्यानुसार विनानंबर प्लेट, नियमबाह्य नंबरप्लेट, अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट अगर नंबर प्लेटवरच नंबरमध्ये खाडाखोड केलेल्या वाहनांवर लक्ष्य करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले. त्या

नुसार रविवारी दिवसभर शहरात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत अशा संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली, त्यातून तब्बल ५२५ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे १ लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.कारण : वाहने संख्या - दंड१) विनानंबर, तुटलेली नंबर प्लेट : १८१ - ३६,२००२) विना लायसन्स : १०० -२०,०००३) वनवे तोडणे : ५६-११,२००४) पोलीस इशारा न जुमानणे : ९६-१९,२००५) अतिवेगाने वाहन चालवणे : ९२-९२,०००

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर