शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

वाचनाची चिकित्सा डोळस हवी

By admin | Updated: December 5, 2014 23:19 IST

शाम मानव : जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी कणकवलीत मार्गदर्शन

कणकवली : एखाद्या वचनाची चिकित्सा करता येत नाही, तेव्हा श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर होते. त्यासाठी डोळस श्रद्धा ठेवावी. आपल्या श्रद्धा वेळोवेळी तपासून पहाव्यात आणि त्यांची चिकित्सा करावी, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. शाम मानव यांनी व्यक्त केले. आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात वैद्यानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यासंदर्भात काल (गुरुवार) रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभय करगुटकर, निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, समाजकल्याणचे सहआयुक्त जयंत चाचरकर, सुरेश झुरमुरे, तहसीलदार समीर घारे आदी उपस्थित होते.शाम मानव म्हणाले की, अध्यात्मात खूप चांगल्या, हितकारक गोष्टी आहेत. त्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या आमच्या शिबिरातही शिकवतो. अध्यात्म मनाशी रिलेटेड आहे. विज्ञानाशी लढणारे अध्यात्म अस्तित्वात नाही. माणसाने विचार करण्याच्या शक्तीवर समृद्धी निर्माण केली. वैज्ञानिक प्रक्रियेतून गेल्या १०० वर्षांत जेवढी प्रगती झाली तेवढी मागील दहा लाख वर्षांत झाली नव्हती. सुरेश झुरमुरे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन करा : दिलीप पांढरपट्टेदिलीप पांढरपट्टे म्हणाले की, बहुतेक सगळे बुवा थोतांड निर्माण करणारे असतात. कोकणातील वातावरणच असे आहे की येथे अंधश्रद्धा जास्त निर्माण होतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची व्याख्या धूसर आहे. अंधश्रद्धेविरोधात काम करताना लोकांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. या कामाविरोधात लोक चिडून बोलतात हे चळवळीचे अपयश आहे. समोरच्याला शत्रू करण्याची भूमिका असू नये. लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन केले पाहिजे. एखाद्याला धार्मिक कृत्यातून समाधान मिळत असेल तर त्याच्या भानगडीत पडू नये. प्रत्येक वेळी समोरच्याला काही कळत नाही, असे समजू नये. जादूटोणाबाबत प्रशिक्षण आवश्यकबुवाबाजीमुळे होणाऱ्या लुबाडणुकीवर आळा घालण्यासाठी ड्रग अ‍ॅण्ड रेमेडीज अ‍ॅक्ट अपुरा पडू लागला. त्यासाठी प्रभावी कायद्याची गरज वाटू लागली. त्यातून झालेल्या चळवळीतून जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. हा कायदा एकमेवाद्वितीय असून व्यापक आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांनाही तो समजला पाहिजे. हा कायदा देवाधर्माविरोधात नाही. तरीही कायद्यातील तरतुदींमुळे निर्दोष माणसे तुरूंगात जाऊ शकतात. यासाठी कलम ६ वेगळे ठेवावे लागले. कोणीही तक्रार करण्याच्या तक्रारीने या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, असा आमदारांचा आक्षेप होता. त्यासाठी दक्षता अधिकारी नेमण्यात आले आहेत, शाम मानव म्हणाले.