शिरढोण खूनप्रकरणी आरोपी अद्याप मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST2021-02-06T04:44:54+5:302021-02-06T04:44:54+5:30

येथील शेतमजूर महिला खोत मजुरी करून दुपारी घरी परतत असताना शनिवारी (दि. २३) किशोर माणगावे यांच्या शेतात अज्ञाताने मानेवर ...

Accused in Shirdhon murder case still at large | शिरढोण खूनप्रकरणी आरोपी अद्याप मोकाटच

शिरढोण खूनप्रकरणी आरोपी अद्याप मोकाटच

येथील शेतमजूर महिला खोत मजुरी करून दुपारी घरी परतत असताना शनिवारी (दि. २३) किशोर माणगावे यांच्या शेतात अज्ञाताने मानेवर धारदार शस्त्राने पाठीमागून वार करून खून केला होता. घटनास्थळी कुरुंदवाड पोलिसांसह अप्पर पोलीस अधीक्षक अश्विनी गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी भेट देऊन तपास गतिमान झाल्याने अज्ञात मारेकऱ्याच्या लवकरच मुसक्या आवळणार अशी आशा मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांना होती. मात्र, दोन आठवडे उलटले तरी अद्याप खुनी शोधण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश न आल्याने व आरोपी मोकाटच राहिल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

आरोपी मोकाट असल्याने शेतमजूर महिला शेतात मजुरीसाठी जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा, अशी नागरिकांतून मागणी होत असून विविध शेतमजूर संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

------------

चौकट - पोलिसांच्या तपासाबाबत शंका

शिरढोण खून प्रकरणानंतर इचलकरंजी, सांगली येथे अनेक खुनाचे प्रकार घडले. तेथील पोलिसांनी चोवीस तासांच्या आत सराईत गुन्हेगाराला अटक करून सर्वसामान्य जनतेत पोलीस तपासाचा दबदबा राखला आहे. मात्र, शिरढोण खुनाचा तपास करण्यात पोलिसांना अद्याप यश न आल्याने नागरिकांतून पोलिसांच्या तपासाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: Accused in Shirdhon murder case still at large