पूर्व वैमन्स्यातून तरुणावर कोयत्याने हल्ला, चौघांवर गुन्हा : कसबा बावडा येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:18 IST2019-03-18T16:17:57+5:302019-03-18T16:18:47+5:30
कसबा बावडा येथील इंजिनिअररिंग कॉलेज जवळ पूर्व वैमन्स्यातून महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने हल्ला केला. पिलाजी अशोक चव्हाण (वय २३, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) असे जखमीचे नाव आहे.

पूर्व वैमन्स्यातून तरुणावर कोयत्याने हल्ला, चौघांवर गुन्हा : कसबा बावडा येथील प्रकार
कोल्हापूर : कसबा बावडा येथील इंजिनिअररिंग कॉलेज जवळ पूर्व वैमन्स्यातून महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने हल्ला केला. पिलाजी अशोक चव्हाण (वय २३, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) असे जखमीचे नाव आहे.
ही घटना शनिवार (दि. १६) मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. जखमी चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहुपूरी पोलीसांनी संशयित उदय उलपे, योगेश उलपे, नितीन उलपे, निखील उलपे (सर्व रा. उलपे मळा, कसबा बावडा) यांचेवर गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी, फिर्यादी पिलाजी चव्हाण व संशयित उलपे मित्र आहेत. उलपे यांचा सद्दाम मुजावर यांचेत जुना वाद आहे. मुजावर हा पिलाजीचा मित्र आहे. तो कसबा बावडा येथील इंजिनिअरींग कॉलेजच्या समोर उभा असताना संशयितांनी शिवीगाळ करुन त्याचेवर कायेत्याने हल्ला करुन जखमी केले.