शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह, चुलते-चुलती, आजीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:59 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले.

निपाणी : मुलीच्या लग्नाला जाताना लग्नस्थापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात नवरीच्या  भावासह, चुलते चुलती व आजीचा मृत्यू झाला आहे. छाया आदगोंडा पाटील (वय ५५), आदगोंडा बाबू पाटील (५५) महेश देवगोंडा पाटील (२३) चंपाताई मगदूम (८०, सर्व रा. बोरगाववाडी ता. निपाणी) अशी मृत चौघांची नावे आहेत.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात कारमधील जारजण जागीच ठार झाले. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला.स्तवनिधी येथे मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी सर्वजण जात होते. या वेळी हॉटेल अमर नजीक अपघात घडला. या अपघाताची भीषणता इतकी होती की वाहनांचा चक्काचूर झाला आहे. कंटेनरच्या धडकेत कारमध्ये मृतदेह अडकून पडले  होते. दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबरगी, डीएसपी बसवराज यलीगीर, सीपीआय संगमेश शिवयोगी उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहेसूर यांच्यासह अग्निशमन विभागाने भेट देऊन मदत कार्य सुरू केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातhighwayमहामार्गmarriageलग्न