अभिजित बिचुकलेची कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 05:34 IST2019-06-25T05:33:42+5:302019-06-25T05:34:02+5:30
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली.

अभिजित बिचुकलेची कारागृहात रवानगी
कोल्हापूर : धनादेश बाऊन्स प्रकरणी जामीन मिळालेल्या व २०१२ मधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी त्याला दुजोरा दिला.
बिचुकले याचा शनिवारी पहाटे रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी करून त्याची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सकाळी ११ वाजता त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने बिचुकलेला धनादेश बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर केला.
परंतु, २०१२ मध्ये फिरोज पठाण यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही बिचुकले हा न्यायालयीन कामकाजात हजर राहत नव्हता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. अभिजित बिचुकलेवर आणखी काही गुन्हे आहेत का?
याची पडताळणी केली असता खंडणी प्रकरणात त्याला वॉरंट बजावले असल्याचे समोर आले. त्यामुळेच त्याची रवानगी
सातारा जिल्हा रुग्णालयातील कोठडीत करण्यात आली
होती.
खटल्याची पुढील सुनावणी २७ जूनला होणार असून,
डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो तंदरुस्त असल्याचे सांगितले.