संभाजी ब्रिगेडच्या हाकेला आणूरकरांची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:58+5:302021-05-31T04:18:58+5:30

म्हाकवे : कोरोना महामारीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंचगंगा स्मशानभूमीत ...

Aanurkar's call to Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेडच्या हाकेला आणूरकरांची साद

संभाजी ब्रिगेडच्या हाकेला आणूरकरांची साद

म्हाकवे : कोरोना महामारीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंचगंगा स्मशानभूमीत जळाऊ शेणी व लाकडांची टंचाई निर्माण झाली आहे. याची दखल घेत आणूर (ता. कागल) येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेणी आणि लाकूड जमा करण्याचा निर्णय घेतला व त्यांना ग्रामस्थांनाही प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल आठ टन लाकूड आणि सुमारे तीन हजार शेणी जमा झाल्या. या जमा झालेल्या शेणी व लाकडे पंचगंगा स्मशानभूमीत पोहोच करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मामा भोळे, माजी उपाध्यक्ष सुनील गायकवाड, दत्तात्रय लोहार, ग्रामपंचायत सदस्य राहुल कुंभार, दीपक माने, सचिन परिट, विठ्ठल आरडे, सुहास लोकरे, प्रवीण भोळे, संजय दळवी, राजेंद्र वांगळे, अवधूत लोहार, अभिजीत सावडकर, राऊ मुरदुडे, दादासो पाटील, सागर कोळी, संजय सावडकर, ज्ञानदेव लोहार, वैभव रेडेकर, गुरू गंगाधरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Aanurkar's call to Sambhaji Brigade