Kolhapur: होडयाच्या शर्यतीतील वाद, हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 13:26 IST2024-08-17T13:23:36+5:302024-08-17T13:26:02+5:30
दत्ता बिडकर हातकणंगले : होडयाच्या शर्यतीवेळी दोन समाजातील युवकामध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बाबासो ...

Kolhapur: होडयाच्या शर्यतीतील वाद, हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
दत्ता बिडकर
हातकणंगले : होडयाच्या शर्यतीवेळी दोन समाजातील युवकामध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बाबासो कांबळे (रा. रुई) असे मृत युवकाचे नाव आहे. सचिनच्या मृत्यूनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुई ता. हातकणंगले येथे सप्टेबर २०२३ मध्ये होडयाच्या शर्यतीवेळी बौद्ध समाज आणि मातंग समाजाच्या युवकामध्ये हाणामारी झाली होती. हा विषय मिटवण्यासाठी गेलेल्या दोन्ही समाजाच्या युवकामध्ये रुई, साठेनगर येथे काल, शुक्रवारी रात्री पुन्हा हाणामारी झाली. यामध्ये सचिन कांबळे सह तीन ते चार युवक गंभीर जखमी झाले होते. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आज, शनिवारी पहाटे उपचारादरम्यान सचिन कांबळे याचा मूत्यू झाला. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे. संशयितांना अटक केल्याशिवाय सचिनचा मृतदेह ताब्यात घेण्यास बौद्ध समाजाने नकार दिल्याने दोन्ही वसाहतीमध्ये पोलिसाचे जलद कृती दल पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून मातंग समाजातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.