शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Accident News: स्पर्धा परीक्षेचे स्वप्न भंगले, गगनबावडा मार्गावर तरुणाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:41 IST

दुचाकीला टेम्पोची समोरासमोर धडक, एक गंभीर जखमी 

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरे-वाकरे हद्दीत दुचाकीची मालवाहतूक टेम्पोला समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.सौरभ संजय सुतार (वय २४, रा. खुपिरे, ता. करवीर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे, तर त्याचा मित्र आकाश सर्जेराव सुतार (२४, रा. शिंदेवाडी) हा गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला. पोलिस पाटील सविता गुरव यांनी अपघाताची माहिती करवीर पोलिसांना दिली. अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी़, खुपिरे येथील सौरभ सुतार व त्याचा मित्र आकाश सुतार हे दोघे दुचाकीवरून कुंभी-कासारी कारखान्यावरून खुपिरेकडे निघाले होते. याचवेळी कोल्हापूरहून गोव्याकडे छोटा मालवाहतूक टेम्पो जात होता. साडेअकराच्या दरम्यान कोल्हापूर-गगनबावडा मुख्य मार्गावर पेट्रोल पंपासमोर दुचाकीची मालवाहतूक टेम्पोला जोरात धडक झाली. यामध्ये सौरभ सुतार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली, तर त्याचा मित्र आकाश सुतार हाही गंभीर जखमी झाला.तातडीने दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी १०८ ॲम्बुलन्समधून कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच सौरभ सुतारचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात आईवडील, भाऊ असा परिवार आहे.कुटुंबावर आभाळ कोसळलेसौरभ सुतार हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील सुतारकाम करतात. आज त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हाताशी आलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने सुतार कुटुंबावर आभाळ कोसळले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Accident ends dreams; youth dies on Gaganbawda road.

Web Summary : A young man died in an accident near Kolhapur on the Gaganbawda road after his motorcycle collided with a tempo. The deceased, Saurabh Sutar, was preparing for competitive exams. Another youth was seriously injured.