कोल्हापुरात तरुणाचा दगडाने ठेचून खून, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

By उद्धव गोडसे | Updated: October 28, 2024 11:40 IST2024-10-28T11:39:29+5:302024-10-28T11:40:24+5:30

एक संशयित ताब्यात

A youth was crushed to death by a stone in Kolhapur | कोल्हापुरात तरुणाचा दगडाने ठेचून खून, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

कोल्हापुरात तरुणाचा दगडाने ठेचून खून, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

कोल्हापूर : रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या कोरगावकर कंपौंडमध्ये सतीश पाटील (वय ४८, रा. शाहूपुरी) याचा चार ते पाच जणांनी दगडाने ठेचून खून केला. ही घटना रविवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री काही तरुण कोरगावकर कंपौंड येथे मद्यप्राशन करीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणातून वाद झाला. चार ते पाच जणांनी सतीश पाटील याच्यावर हल्ला केला. दगडाने मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. 

हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी जखमीस सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयितांची नावे निष्पन्न केली असून, रोहन विजय गायकवाड (चिक्या) याला ताब्यात घेतले. सौरभ दीपक जाधव आणि धीरज करंगळे यांचा शोध सुरू आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: A youth was crushed to death by a stone in Kolhapur