Kolhapur Crime: लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून करून पळालेल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By उद्धव गोडसे | Updated: June 5, 2025 13:51 IST2025-06-05T13:51:17+5:302025-06-05T13:51:32+5:30

शाहूवाडी तालुक्यातील जंगलात घेतला गळफास

A young man who murdered his live in girlfriend and fled committed suicide in Kolhapur | Kolhapur Crime: लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून करून पळालेल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Kolhapur Crime: लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून करून पळालेल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

उद्धव गोडसे

कोल्हापूर : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून लिव्ह इनमधील प्रेयसीचा चाकूने भोसकून खून करून पळालेला सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री, ता. शाहूवाडी) याने शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे-कातळेवाडी परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. ५) सकाळी निदर्शनास आला. मंगळवारी (दि. ३) सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात प्रेयसी समीक्षा हिचा खून करून तो पळाला होता. 

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश यादव आणि समीक्षा भारत नरसिंगे (२३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे दोघे गेल्या चार महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. यादव याने लग्न करण्याचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून त्याने मंगळ‌वारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान चाकूने भोसकून समीक्षाचा खून केला. हल्ला करून तो समीक्षा आणि तिच्या मैत्रिणीला घरात कोंडून दुचाकीवरून पळून गेला होता.

बाजारभोगावमार्गे तो शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्राकडे गेला. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तो मित्राला काही न सांगता निघून गेला. मित्रासह पोलिस त्याचा शोध घेत होते. 

गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माळापुडे-कातळेवाडी येथील जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला. त्याने बुधवारी सकाळीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली. 

दोन दिवस कसून शोध

खून करून पळालेला सतीश यादव याच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके कार्यरत होती. यादव याचे गावाकडील घर, सर्व मित्र, नातेवाईक आणि पैपाहुण्यांकडे त्याचा शोध घेतला. जिल्ह्यातील सर्व लॉजचीही तपासणी केली होती. अखेर त्याने आत्महत्या केल्याचे समजताच पोलिसांचा तपास थांबला.

Web Title: A young man who murdered his live in girlfriend and fled committed suicide in Kolhapur