Kolhapur: लग्न जुळत नसल्याने नैराश्य; खेडे येथील युवकाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:09 IST2024-03-28T13:09:08+5:302024-03-28T13:09:27+5:30
आजरा : लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून खेडे (ता. आजरा) येथील अरुण प्रकाश कांबळे (वय ३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी ...

Kolhapur: लग्न जुळत नसल्याने नैराश्य; खेडे येथील युवकाने संपवले जीवन
आजरा : लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून खेडे (ता. आजरा) येथील अरुण प्रकाश कांबळे (वय ३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो आजऱ्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून काम करीत होता. आजरा तालुक्यात युवकांचे आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे.
होळी व धूलिवंदनच्या सणामध्ये अरुण घरातून बाहेर आला नाही म्हणून काल रात्री त्याची चौकशी सुरू झाली. भाऊ किरण याने दरवाजा उघडून पाहिले असता घरातील तुळईला अरुणने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
अरुण याच्या आई-वडीलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. अरुण गावातील घरात तर भाऊ किरण दुसऱ्या घरात राहतो. अरुण गेली तीन ते चार वर्षे आजरा येथील एका हॉटेलमध्ये काम करीत होता. तो आपले लग्न होत नाही या नैराश्येतून मानसिक तणावाखाली होता. अखेर त्याने घरातच आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात भाऊ, भावजई असा परिवार आहे.