शहरं
Join us  
Trending Stories
1
३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
2
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
3
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
4
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
5
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
6
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
7
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
8
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
9
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
10
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
11
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
12
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
13
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
14
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
15
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
16
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
17
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
18
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
19
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दिल को, बाजार नही बनाया; स्टेटस ठेवून कोल्हापुरातील तरुणाने घेतली पंचगंगेत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:01 IST

Kolhapur Crime: व्हॉट्सॲप स्टेटस आणि मोबाइल कॉल डिटेल्सवरून सुगावा लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली

कोल्हापूर : 'मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे. ‘दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून सुमित विक्रांत तेली (वय ३०, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या तरुणाने शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने सुमितचे मित्र आणि नातेवाईकांना धक्का बसला.मृत सुमितच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो शुक्रवार पेठेतील घरात आई-वडील आणि लहान भावासोबत राहत होता. शाहूपुरीत त्याचे रेडियम आर्ट आणि ट्रॉफी तयार करण्याचे दुकान होते. त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. बुधवारी दिवसभर तो मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता. रात्री पावणेनऊच्या सुमारास त्याने व्हॉटस्ॲप स्टेटस बदलले. 'मला माझ्या चारित्र्याचा अभिमान आहे. दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,' असा स्टेटस त्याने ठेवले. त्यानंतरही तो काही मित्रांच्या संपर्कात होता.रात्री अकराच्या सुमारास त्याने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेतल्याचे त्याच्या ओळखीतील व्यक्तींनी पाहिले. याची माहिती त्यांनी त्याच्या नातेवाइकांना दिली. अग्निशामक दलाच्या जवानांसह करवीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी शोधमोहीम राबवली. साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह शिवाजी पुलापासून काही अंतरावर सापडला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.स्टेटसची चर्चासुमित उत्साही आणि सतत कामात राहणारा धडपडी तरुण होता. बुधवारी रात्री त्याने व्हॉट्सॲपचे स्टेटस बदलले. त्यानंतर काही तासांत त्याने आत्महत्या केली. त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस आणि मोबाइल कॉल डिटेल्सवरून सुगावा लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Youth Ends Life in River After WhatsApp Status Update

Web Summary : A Kolhapur youth, Sumit Teli, tragically ended his life by jumping into the Panchganga River from a bridge after posting a cryptic WhatsApp status. His body was recovered, and police are investigating the reason for his suicide. Friends and family are shocked by the incident.
टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस