कोल्हापुरातील चिखलीमधील तरुणाचा मित्रानेच केला खून, आरोपी स्वतःच पोलिसात झाला हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:59 IST2022-11-09T13:47:57+5:302022-11-09T13:59:22+5:30
अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही.

कोल्हापुरातील चिखलीमधील तरुणाचा मित्रानेच केला खून, आरोपी स्वतःच पोलिसात झाला हजर
राजेंद्र पाटील
प्रयाग चिखली: करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील तरुणाचा वडणगे फाटा येथे खून झाला. किरण दिनकर नाईक (वय ३८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खुनानंतर स्वतः आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
किरण नाईक हा शेतकरी कुटुंबातील तरुण होता. काल, मंगळवारी रात्री तो मित्रांसोबत गेला होता. सोबत असणाऱ्या मित्रानेच त्याचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. खुनानंतर स्वतः आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खुनाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी किरणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती पोलिसांनी किरणच्या कुटुंबीयांना दिली. किरणच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे. किरण अविवाहित होता.
किरण हा स्वभावाने शांत होता. खुनाच्या प्रकारानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून काही धागेदोरे हाती लागतात का याचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही.