Kolhapur- गणपती घेऊन येताना दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडला, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 16:50 IST2023-09-20T16:23:04+5:302023-09-20T16:50:49+5:30
घरासमोर आल्यानंतर गणपती घरात घेण्यासाठी आईला हाक मारत घरात जाताना घडली दुर्दैवी घटना

Kolhapur- गणपती घेऊन येताना दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडला, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला
पेरणोली : बोलकेवाडी (ता. आजरा) येथे घरी गणपती घेऊन येताना पाय घसरून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन शिवाजी सुतार (वय ३८) असे दुर्दैवी तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, सुतार हे मुंबई येथे नोकरी करतात. गणेशोत्सवासाठी सोमवारी (१८) ते गावी आले होते. मंगळवारी (१९) सकाळी साडेसात वाजता घरी मित्राच्या डोक्यावर गणपतीची मूर्ती देऊन ते सोबत आले होते. घरासमोर आल्यानंतर गणपती घरात घेण्यासाठी आईला हाक मारत घरात जात होते.
गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे दारात निसरडे झाल्याने दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील एका खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, बहीण, भाऊ असा परिवार आहे.