कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर कोपार्डेमध्ये शेतवडीत तरुणाचा मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:49 IST2023-03-23T14:48:44+5:302023-03-23T14:49:08+5:30
प्रकाश पाटील कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे कोल्हापूर -गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष ज्ञानदेव ...

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर कोपार्डेमध्ये शेतवडीत तरुणाचा मृतदेह आढळला
प्रकाश पाटील
कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष ज्ञानदेव पोतदार (वय ४०, रा. पणुत्रे ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गावात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत आडुरच्या पोलिस पाटील सरीता पोवार यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष पोतदार हा व्यसनी होता. त्याच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. त्याला चार बहिणी आहेत. त्यातील तिघी विवाहित आहेत तर, एक अविवाहित आहे. तो व्यसनी असल्याने घरी थांबायचा नाही. त्याच्या व्यसनाला कंटाळून लहान बहिणीने कोल्हापूर येथे नोकरी करत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. संतोष अविवाहित होता.
आज सकाळी कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील कोपार्डे येथील फरशीच्या ओढ्याजवळ संतोष मृतावस्थेत आढळला. याची माहिती आडूरच्या पोलिस पाटील सरीता पोवार यांना मिळताच त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला.