कोल्हापुरात जयंती नाल्यात सापडला महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?, तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 17:14 IST2023-01-28T17:13:36+5:302023-01-28T17:14:39+5:30
उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला

कोल्हापुरात जयंती नाल्यात सापडला महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?, तपास सुरु
उद्धव गोडसे
कोल्हापूर : येथील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज, शनिवारी (दि. २८) चारच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. अंदाजे 35 वर्षे वयाच्या महिलेचा हा मृतदेह आहे. संबंधित महिलेने आत्महत्या केली, की तिचा घातपात झाला याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.
जयंती नाल्यात मृतदेह आढळल्याची माहिती मिळतात शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी संबंधित महिलेने आत्महत्या केली असावी, किंवा तिचा मृतदेह जयंती नाल्यात टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला आहे.
मृतदेहाच्या तपासणी अहवाला नंतरच संबंधित महिलेने आत्महत्या केली की तिचा घात झाला, ते स्पष्ट होईल अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी दिली.