कोल्हापुरातील जवानाचे पठाणकोटमध्ये आकस्मिक निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:25 IST2025-10-20T15:24:39+5:302025-10-20T15:25:13+5:30
कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीसुद्धा परिस्थितीशी संघर्ष करून सेनादलात सहभागी झाले होते

कोल्हापुरातील जवानाचे पठाणकोटमध्ये आकस्मिक निधन
प्रयाग चिखली : पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील भारतीय सेनादलात कार्यरत असणारे सागर पुंडलिक सारंग यांचे पठाणकोट येथे सेवेत असताना आकस्मिक निधन झाले.
त्यांचे पार्थिव आज, सोमवारी सकाळी सात वाजता वरणगे पाडळी बुद्रुक गावामध्ये येणार आहे. त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सारंग यांच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीसुद्धा परिस्थितीशी संघर्ष करून सागर हे सेनादलात सहभागी झाले.
त्यांचे वडील पुंडलिक सारंग हे गावच्या पाणीपुरवठा विभागातून निवृत्त झालेले आहेत. त्यांचे थोरले भाऊ संदीप सारंग हे ‘महावितरण’मध्ये सेवेत आहे. सारंग हे महावितरणमध्ये सेवेत आहे. अत्यंत संघर्षातून वाटचाल केलेल्या कुटुंबावर हा आघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.