Kolhapur: शाळेला न जाता कुठे गेली होतीस म्हणून विचारले, रागातून मुलीने जीवन संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:09 IST2025-07-19T16:09:49+5:302025-07-19T16:09:57+5:30
सिव्हिल ड्रेस घालून शाळेला जातो असे सांगून घरातून ती निघून गेली

Kolhapur: शाळेला न जाता कुठे गेली होतीस म्हणून विचारले, रागातून मुलीने जीवन संपविले
गांधीनगर : शाळेला न जाता कोठे गेली होतीस असे आई-वडिलांनी विचारल्याच्या रागातून सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील अर्पिता विवेक देसाई (वय १३, रा. सहारा कॉलनी, सरनोबतवाडी) या शाळकरी मुलीने घरातील लोखंडी तुळईला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अर्पिता कोल्हापुरातील एका शाळेत नववीमध्ये शिकत होती. गुरुवारी (दि. १७) सिव्हिल ड्रेस घालून शाळेला जातो असे सांगून घरातून ती निघून गेली, पण ती शाळेत नसल्याचे शाळेतून सांगण्यात आले. आई-वडिलांनी मुलीचा शोध घेतला, पण ती आढळली नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास अर्पिता घरी परतली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी शाळेत न जाता तू कुठे गेली होतीस, अशी विचारणा केली.
त्या रागातून आई-वडील बाहेर गेले असता शुक्रवारी (दि. १८) घरातील लोखंडी तुळईस साडीने गळफास घेतला. नातेवाइकांनी तिला बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची वर्दी विकी एकनाथ साळोखे (वय ३२ रा. मेघराज कॉलनी, वळीवडे) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.