Kolhapur: कर्ज वसुलीला आलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:16 IST2025-04-28T15:16:20+5:302025-04-28T15:16:46+5:30
पेठवडगाव : सावर्डे (ता. हातकणंगले) येथे फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या प्रतिनिधीस काठीने मारहाण केली. याप्रकरणी पाच तरुणांवर गुन्हा ...

Kolhapur: कर्ज वसुलीला आलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा
पेठवडगाव : सावर्डे (ता. हातकणंगले) येथे फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या प्रतिनिधीस काठीने मारहाण केली. याप्रकरणी पाच तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बशीर मकानदार, सलमान मकानदार, सोन्या उर्फ सचिन चव्हाण, प्रतीक चव्हाण, बंट्या उर्फ संकेत चव्हाण (सर्व रा. सावर्डे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी घडली. रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. प्रतीक संजय कांबळे (वय २३, रा. विद्या कॉलनी, पेठवडगाव) यांनी फिर्याद दिली. विरोधी गटाने अदखलपात्र गुन्हा नोंद केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यश संदीप हावळचे एका फायनान्सच्या कोडोली शाखेत कर्ज वसुली विभागात काम करतात. ते सावर्डे (ता. हातकणंगले) येथे शनिवारी सायंकाळी कर्जदार रफीक कवठेकर (रा. सावर्डे) यांच्या घरी थकीत कर्जाचा हप्ता वसुलीसाठी गेले होते. यावेळी कवठेकर घरी नव्हते.
घर मालक बशीर मकानदार व त्यांचा मुलगा सलमान यांनी तुम्ही येथे आत कसे काय आला, असे म्हणत हावळ यांच्यासोबत वाद घातला. दरम्यान, ग्रामस्थांची गर्दी झाली. या गर्दीमधील सोन्या उर्फ सचिन चव्हाण, प्रतीक चव्हाण यांनी हावळ यांना पकडले, तर संकेत चव्हाण याने काठीने मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर अधिक तपास करीत आहेत.