शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगेतील केंद्रांवर समान मतांची पोस्ट हा खोडसाळपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:24 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण : फॉरवर्ड करणाऱ्यावर कारवाई

इंदुमती सूर्यवंशी,  लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील यांना समान मते असलेली पोस्ट व्हायरल करणे हा जाणीवपूर्वक कॉपी-पेस्ट करून केलेला खोडसाळपणा आहे. असा कोणताही प्रकार प्रत्यक्षात त्या केंद्रांवर झालेला नाही. हे कुणी केले याचा शोध घेण्यास पाेलिसांना सांगितले असून ही चुकीची माहिती फॉरवर्ड करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी शुक्रवारी दिला.हातकणंगलेमधील ओकोली, करंजोशी, ससेगाव, चनवाड, सवते, वडगाव, सावे, जुळेवाडी, भैरवाडी, शिराळे तर्फ मलकापूर, थेरगाव, सरुड, चरण आदी गावांतील सुमारे ४२ मतदानकेंद्रांवर शेट्टी व डी. सी. पाटील यांना समान मते पडल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. निवडणूक यंत्रणेकडून या चुका झाल्या आहेत का..? असा प्रश्न निर्माण करून यंत्रणेबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्यात आले. यााबाबत विचारले असता जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, असा कोणताही प्रकार या केंद्रावरील मतमोजणीत झालेला नाही. कोणत्या केेंद्रावर किती मते पडली व प्रत्यक्षात झालेली मतमोजणी यांचा आकडा जुळल्याशिवाय मतमोजणी करणारे अधिकारी-कर्मचारी पुढील मतमोजणी करत नाहीत. मतमोजणी दिवशी प्रत्येक उमेदवाराचे मतमोजणी प्रतिनिधी त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक झाली असून व्हायरल पोस्टमध्ये काहीही तथ्य नाही. जाणीवपूर्वक हे कॉपी पेस्ट केले आहे. हे कोणी केले याचा शोध पोलिस घेतीलच पण नागरिकांनी ही चुकीची माहिती फॉरवर्ड करू नये. दरम्यान हातकणंगलेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी या सर्व केंद्रांवरील मतमोजणीच्या आकडेवारीचा चार्टच प्रसारमाध्यमांना देऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली.--

केंद्र क्र : शेट्टी, डी. सी. पाटील यांची प्रत्यक्ष मते : व्हायरल पोस्टमधील डी. सी. पाटील यांची मते७३ : १७ : ० : १७

८० : २२ : ४ : २२११३ : १८ : ७ : १८

१२५ : २ : १ : ४१३३ : ५६ : ० : ५६

१४२ : २० : २ : २०(पोस्टमध्ये राजू शेट्टी यांना मिळालेल्या मतांचाच आकडा कॉपी पेस्ट करून डी. सी. पाटील यांच्या नावापुढे जोडला आहे.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर