शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अपघातात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवली कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:08 IST

संतप्त जमावाचा नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा : गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप

नेसरी : अपघातातील बाळंतिणीचा मृत्यू आणि अपघातासकारणीभूतकार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याच्या रागातून संतप्त जमावाने कार पेटवली, तसेच नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिस उपनिरीक्षक आबा गाढवे यांना निलंबित करण्याची मागणी केली.चंदगड-गडहिंग्लज राज्य मार्गावर गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. अडकूर येथील राहुल विजय कुंदेकर हे आठवड्यापूर्वी झालेली पत्नी सुवर्णा, सात दिवसाच्या नवजात बाळ, सासू व २ वर्षांचा मुलासह चारचाकी कारने (एमएच ०४ डीएन ३७४९) गडहिंग्लजहून अडकूरकडे जात होते.दरम्यान, चंदगडकडून कोल्हापूरकडे जाणा-या चारचाकी कारने (एमएच ०९ जीए ७५१५) त्यांच्या कारगाडीला कानडेवाडीनजीक धडक दिली. धडकेत कुंदेकर यांच्या कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यातील जखमी बाळंतीण सुवर्णा यांचा शुक्रवारी पहाटे उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या अडकूर ग्रामस्थांसह जमावाने नेसरी पोलिस ठाण्यावर धडक मारली.अपघातास कारणीभूत कार चालक स्वप्निल रवींद्र रानगे (रा.कोल्हापूर) याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, मृत बाळंतिणीचे पार्थिव आणि अंत्यसंस्कारासाठी आणलेली लाकडे पोलिस ठाण्यासमोर आणली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, सरपंच गिरीजादेवी शिंदे यांच्यासह अडकूर ग्रामस्थांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे सपोनि.आबा गाढवे यांना निलंबित करण्याची मागणी केली.

कुंदेकर कुटुंबीयांना धक्काराहुल यांचे वडील विजय कुंदेकर यांचे ४ जानेवारीला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर ९ जानेवारीला सुवर्णा हिने बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाला घरी घेऊन जाताना झालेल्या अपघातात पत्नीला काळाने गाठले. त्यामुळे राहुल यांच्यासह कुंदेकर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.नवजात बालकाचाही मृत्यूग्रामीण रुग्णालयात जन्मलेले बाळ घरी घेऊन जाताना अपघातात जखमी झाले होते. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी आठ दिवसांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईपाठोपाठ बाळाचाही मृत्यू झाल्याने अडकूर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आश्वासनानंतर जमाव शांतदरम्यान, शुक्रवारी सकाळी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरोपीची कारगाडी जाळली. कार चालकाला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Accident Kills Mother, Newborn; Mob Sets Car Ablaze

Web Summary : A tragic accident in Kolhapur claimed the lives of a new mother and her week-old baby. Outraged villagers, alleging delayed police action, torched the car responsible and demanded the suspension of a police officer. Tensions rose as the community mourned the devastating loss.