शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Accident: रंकाळ्याजवळ अल्पवयीन कारचालकाने दोघांना उडवले; एक ठार, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:47 IST

पिता-पुत्रावर गुन्हा दाखल; अपघातात ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट करताच संदीप पोवार याचे मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला

कोल्हापूर : अल्पवयीन कारचालकाने बेदरकारपणे कार चालवून समोरून आलेल्या दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार संदीप शिवाजी पोवार (वय ३२, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला शैलेश शिवकुमार कदम (३०, रा. राजघाट, शिवाजी पेठ) हा गंभीर जखमी झाला.हा अपघात मंगळवारी (दि. २३) मध्यरात्रीच्या सुमारास झाला. याप्रकरणी कारमालक श्रीकांत वसंतराव जाधव (४८, साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ) आणि कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या त्याच्या १७ वर्षीय मुलावर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत शिवाजीराव पोवार (३९, रा. आयरेकर गल्ली) यांचा भाऊ संदीप आणि त्याचा मित्र शैलेश कदम हे दोघे दुचाकीवरून साकोली कॉर्नरकडून रंकाळ्याकडे निघाले होते. तवटे वखारीजवळ समोरून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला उडवले. त्यावेळी दुचाकी चालवणारा संदीप आणि मागे बसलेला शैलेश दोघे उडून बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाले.परिसरातील नागरिकांनी तातडीने दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान बुधवारी रात्री संदीप ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर रात्री उशिरा त्याला मृत घोषित केले. शैलेश याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याप्रकरणी मुलाचे वडील श्रीकांत जाधव आणि त्यांच्या १७ वर्षीय मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.

संदीपचे अवयवदानअपघातात ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट करताच संदीप पोवार याचे मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यानुसार डॉक्टरांनी पुढील प्रक्रिया राबवली. कठीण प्रसंगातही पोवार कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाचे डॉक्टरांनी कौतुक केले. तो इलेक्ट्रिशियनची कामे करीत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.आठवड्यात दुसरा अपघातअल्पवयीन चालकाने दुचाकीस्वारांना उडवल्याचा आठवड्यात दुसरा अपघात घडला. शनिवारी (दि. २०) मध्यरात्री एकच्या सुमारास उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ अल्पवयीन कार चालकाने दुचाकीस्वारांना उडवल्याने गिरगावमधील (ता. करवीर) तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री शहरात आणखी एका अल्पवयीन कारचालकाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला. आठवड्यात दोन अपघात झाल्याने अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देण्याचा धोका स्पष्ट झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Minor Driver Kills One, Injures Another in Accident

Web Summary : In Kolhapur, an underage driver fatally struck a motorcyclist and severely injured another near Rankala Lake. The 32-year-old motorcyclist died, while his passenger is recovering. Police have arrested the car owner and his 17-year-old son. This is the second such incident in a week involving a minor driver.