शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्याचा खून, तपासात समोर आले धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:35 IST

अल्पवयीन मुलाच्या कृत्याने समाजाला हादरवून टाकले

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून आपल्याला सुटी मिळावी, यासाठी फैजान नजिम (वय ११, रा. बिहार) या अल्पवयीन मुलाचा त्याच्याच अल्पवयीन सहकाऱ्याने रविवारी रात्री तोंडात कापडाचा बोळा घालून व विजेचा शॉक देऊन खून केल्याची कबुली दिली. अल्पवयीन मुलाच्या कृत्याने समाजाला हादरवून टाकले. संशयित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल निरीक्षणगृहात केली. हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, अधिक तपास सुरू आहे.या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये सुमारे साठहून अधिक मुले राहतात. तिथे १६ जूनच्या पहाटे पाच वाजता अल्पवयीन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हातकणंगले पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शिक्षकांची चौकशी केली. सोमवारी रात्री ११ वाजता गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले. याच शैक्षणिक संस्थेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने झोपलेल्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने शॉक देऊन खून केल्याची कबुली दिली. धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून घरी जायला मिळावे यासाठी गुन्हा केल्याची कबुली अल्पवयीन मुलाने पोलिस आणि मानसोपचार तज्ज्ञांसमोर दिली. या घटनेने शिक्षण संस्थेसह परिसरात खळबळ उडाली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिकतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बाल हक्क कार्यकर्त्यांनी सांगितले. अधिकारीही थक्कपोलिसांसमोर जबाब नोंदविता येत नसल्याने खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बोलते करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे आणि बालकल्याण समितीच्या सदस्याला बोलविण्यात आले. यानंतर अल्पवयीन मुलगा बोलता झाला. अतिशय क्रूर पद्धतीने त्याने मित्राचाच खून केला. विशेष म्हणजे या घटनेत त्याच्यासह आसपास झोपलेल्या मुलांनाही धोका होता. मात्र, याचा कोणताही विचार न करता त्याने विजेचा शॉक देऊन मित्राचा खून केल्याचे ऐकताच अधिकारी थक्क झाले.

पोलिस अधीक्षकांकडून पाहणीपोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आळते येथील शिक्षण संस्थेस भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. संशयित विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी करावी तसेच त्याच्या मित्रांशी बोलावे, अशा सूचना अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार हातकणंगले पोलिसांनी तपास करून संवेदनशील गुन्ह्याचा उलगडा केला.

आणखी काही संशयितांची शक्यताया गुन्ह्यात आणखी काही मुलांचा सहभाग असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार आणखी दोन मुलांची चौकशी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कट करून हा गुन्हा केला असावा. यासाठी त्याने वायर कुठून आणली? गुन्हा केल्यानंतर वायर कुठे लपवली? याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रारआळते येथील घटनेनंतर कोल्हापुरातील बाल हक्क कार्यकर्ते अतुल देसाई यांनी मंगळवारी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये बालकांच्या हक्कांचे उल्लंघन होते. राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच संस्थांची तपासणी करून बालकांची होणारी पिळवणूक थांबवावी तसेच आळते येथील घटनेचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आळते येथील खुनाच्या घटनेच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. - वंदना जैन, अवर सचिव, बालहक्क आयोग महाराष्ट्र

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिस