कोल्हापूर सर्किट बेंचसमोर भले मोठे झाड कोसळले; दोघे जखमी, दुचाकींचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:22 IST2026-02-10T14:21:02+5:302026-02-10T14:22:24+5:30
संरक्षण भिंतीच्या खोदकामामुळे झाडाची मुळं उघडी पडल्याने हे झाड कोसळल्याचा अंदाज

कोल्हापूर सर्किट बेंचसमोर भले मोठे झाड कोसळले; दोघे जखमी, दुचाकींचा चक्काचूर
कोल्हापूर: सीपीआर रुग्णालय, सर्किट बेंचसमोर भाऊसिंगजी रोडवर जुनं भले मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झालेत. तर दोन दुचाकीचं मोठे नुकसान झाले आहे. संरक्षण भिंतीच्या खोदकाम सुरु आहे. या खोदकामामुळे झाडाची मुळं उघडी पडल्याने हे झाड कोसळलं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
सीपीआर रुग्णालयासमोरचे हे झाड खंडपीठाच्या कंपाउंडवर पडले. त्यामुळे संरक्षक कंपाउंडचं नुकसान झाले. अचानक झाड कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. सीपीआर रुग्णालय, सर्किट बेंचमुळे या परिसरात मोठी वर्दळ असते. या घटनेमुळे नागरिकांसाठी हा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण होता. घटना घडल्यानंतर सिपीआर रुग्णालयाचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि महापालिका कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.