शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

Kolhapur: उसाचा वजनकाटा तपासणीचे दीड कोटींची हायड्रोलिक क्रेन गेली गंजून, काटामारी चव्हाट्यावर तरी दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:46 IST

नवीन हंगाम तोंडावर 

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी नुकतेच साखर कारखान्यांत काटा मारणाऱ्यांना सोडणार नाही, अशी घोषणा केली असली तरी कारखान्यात होणारी काटामारी रोखण्यासाठी वजन काटे तपासण्यासाठी शासनाकडून दहा वर्षापूर्वी मिळालेले हायड्रोलिक क्रेन वापराविना गंजून गेले आहे. येथील गोकुळ कार्यालयाच्या आवारात ते सडत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही साखर कारखान्यांंकडून होणाऱ्या काटामारीसंबंधी जाहीर वक्तव्य केल्यानंतर काटा तपासणीच्या या यंत्राचा विषय समोर आला आहे. ऊस गाळपाचा नवीन हंगाम तोंडावर आला आहे. तरीही यंत्र वापरासंबंधी वैधमापन विभाग काहीही हालचाली करीत नसल्याच्या तक्रारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि ऊस उत्पादक शेतकरी संघटनांकडून होत आहे.साखर कारखान्यांकडून काटामारी करून मापात पाप होऊ नये यासाठी त्यांच्या तपासणीसाठी सन २०१४ मध्ये शासनाकडून जिल्ह्यासाठी दीड कोटी रुपयांचे हायड्रोलिक क्रेन वैधमापन विभागाकडे पाठवले. या विभागाच्या कार्यालय आवारात हे यंत्र लावण्यासाठी जागा नसल्याने गोकुळ कार्यालय परिसरात पार्क केले आहे. काटा तपासणीसाठी यंत्र वापरले नसल्याने पावसाळ्यात त्यावर गवत उगवते. यंत्र उघड्यावर पार्क केल्याने गंजले आहे. त्यावर प्रचंड प्रमाणात झाडांची पाने, कचरा साचली आहेत. वर्षापूर्वी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आंदोलन करून याकडे लक्ष वेधले होते. तरीही वैधमापन प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे आरोप होत आहेत.

गोकुळ प्रशासनाकडून वेळोवेळी पत्र, प्रतिसाद नाही..ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालय परिसरात यंत्र पार्क केले आहे. यंत्र येथून घेऊन जावे, असे पत्र गोकुळ प्रशासनाने वेळोवेळी वैधमापन प्रशासनास दिले आहे. तरीही यंत्र घेऊन जाण्याची आणि वापरण्याची तसदी घेतली नसल्याने ते गंजून जात आहे.

मोबाइलवर ‘नो रिप्लाय’वैधमापन विभागाचे अधिकारी दत्तात्रय पवार यांच्याकडून यंत्रासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसिव्ह केला नाही. यामुळे यंत्र वापराविना एकाच ठिकाणी त्यांनी का थांबवून ठेवले आहे, याची अधिकृत माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही.

दहा वर्षापासून यंत्र चालवण्यासाठी चालक नाही, असे वैधमापन विभागाचे अधिकारी सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात वैधमापन अधिकारी आणि कारखानदार यांचे साटेलोट असल्याने नवीन यंत्र सडवले आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे. - रूपेश पाटील, अध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिग्रेड, कोल्हापूर. 

हायड्रोलिक क्रेन सन २०१४ मध्ये मिळाली. पण, त्यावर चालक, ऑपरेटर नाही. यामुळे यंत्र वापरात नाही. तरीही कारखान्याचे काटे नियमित तपासले जातात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काट्यात तफावत असलेल्या कारखान्यांविरोधात आमच्याकडे तक्रार करावी. - दत्तात्रय पवार, प्रभारी, उपनियंत्रक, वैधमापन विभाग, कोल्हापूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Unused sugarcane scale inspection crane rusting, weighing fraud continues.

Web Summary : A hydraulic crane for sugarcane scale checks, acquired a decade ago, is rusting unused in Kolhapur. Despite claims of addressing sugar mill fraud, inaction persists, raising concerns among farmer organizations.