Kolhapur News: अर्जुननगर येथील जुगार अड्ड्यावर छापा, कारवाई दरम्यान अड्डा मालकाची पोलिसांवर अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 19:53 IST2023-01-05T19:41:09+5:302023-01-05T19:53:59+5:30

अनिल पाटील मुरगूड : कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ४२ ...

A gambling den was raided at Arjunnagar in Kagal taluka kolhapur | Kolhapur News: अर्जुननगर येथील जुगार अड्ड्यावर छापा, कारवाई दरम्यान अड्डा मालकाची पोलिसांवर अरेरावी

Kolhapur News: अर्जुननगर येथील जुगार अड्ड्यावर छापा, कारवाई दरम्यान अड्डा मालकाची पोलिसांवर अरेरावी

अनिल पाटील

मुरगूड : कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ४२ जणांना ताब्यात घेतले. संशयितावर गुन्हे नोंद करून यांच्याकडील सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. कारवाई दरम्यान हॉटेल मालकाने पोलिसांवर अरेरावी केली. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकावर स्वतंत्र गुन्हा नोंद केला.

अर्जुननगर येथे धनश्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या नावाने एक इमारत आहे. या इमारतीत कोल्हापुरातील अमर शिवाजीराव चव्हाण व निपाणी येथील संभाजी बाबुराव जामदार यांनी अनेक लोकांना एकत्रित करून जुगार अड्डा सुरू केला होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ४२ जण ताब्यात घेतले. तर सात लाख ८० हजार २७०  रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. 

ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, पोलिस उपनिरीक्षक शेष पांडुरंग मोरे, सहायक फौजदार हरीश ज्ञानदेव पाटील, प्रकाश पाटील, विलास किरोळकर, किरण शिंदे, संतोष पाटील, रणजीत कांबळे, संजय हुंबे, गुलाब चौगुले, शिवानंद मठपती यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Web Title: A gambling den was raided at Arjunnagar in Kagal taluka kolhapur